लोहिया विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा


सडक अर्जुनी, दिनांक : २९ जानेवारी २०२३ : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात दिनांक २६ जानेवारी २०२३ ला प्रजासत्ताक दिन व वसंत पंचमी ( सरस्वती माता प्रकट दिन ) मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण पंकज लोहिया, सदस्य लो. शि.संस्था यांनी केले. ध्वजारोहक व कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था , सौंदड यांनी भारत माता, सरस्वती माता, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून ध्वजारोहण केले.

यावेळी प्रामुख्याने आ. न. घाटबांधे-संस्था उपाध्यक्ष, प्रभूदयाल लोहिया माजी जि. प. सदस्य, भंडारा, पंकज लोहिया, सदस्य, लो. शिसंस्था, नालिराम चांदेवार, राजकुमार चांदेवार, गुलाब शहारे, दिलीप शहारे, बाबुराव हरणे, राजकुमार भैसारे, डॉ. चन्ने पशू वैद्यकीय अधिकारी, गजानन कापगते, पुरुषोत्तम लांजेवार, लता ताई गहाणे सरपंच फुटाळा, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल आदी उपस्थित होते.

ध्वजारोहन नंतर विद्यालयातील प्राध्यापक डी. ए. दरवडे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामुदायिकपणे वाचन केले. तसेच माता सरस्वतीची आरती करून पुष्प अर्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थापक संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था, सौंदड यांनी प्रजासत्ताक दिन व वसंत पंचमी दिनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनो विद्यालयातून संस्कारयुक्त शिक्षण घेवून जीवनात लोक कल्याणासाठी काहीतरी करा, ज्यामुळे तुमच्या जीवनाचे सार्थक होईल आणि देशासाठी आणि मानवतेसाठी योगदान दिल्याचे तुम्हाला समाधान मिळेल. असे मार्गदर्शन केले.

यावेळी कू. यू. आर. बाच्छल यांनी सुद्धा प्रजासत्ताक दिन व वसंत पंचमी दिना विषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी गीत व भाषनाद्वारे प्रजासत्ताक दिन व वसंत पंचमी दिनाच्या महात्म्याचे वर्णन केले. ध्वजारोहक व कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था यांच्या शुभहस्ते भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमात सर्वांना व्यसन मुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेच्या विविध कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यगण निमंत्रित पाहुणे, गावकरी, पालक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कू. यू. बी. डोये यांनी केले तर आभार टी. बी. सातकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता” वंदेमातरम ” या गीताने करण्यात आली.


 

Leave a Comment