Lohiya school : लोहिया विद्यालयात स्व. मनोहरभाई पटेल जयंती साजरी


सडक अर्जुनी, दिंनाक : १० फेब्रुवारी २०२३ : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात दिनांक ९ फेब्रुवारी रोज गुरुवार ला जगदीश लोहिया संस्थापक /संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था यांच्या प्रेरणेने व प्राचार्य मधुसूदन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनानुसार स्व. मनोहर भाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज लोहिया संस्था सदस्य यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी प्रमुख अतिथी गुलाबचंद चिखलोंढे प्राचार्य रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल, मनोज शिंदे मुख्याध्यापक जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा हे उपस्थित होते.

विद्यालयातील आर. आर. मोहतुरे यांनी स्व. मनोहर भाई पटेल यांच्या जीवनकार्या ची माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेक्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स. शिक्षिका यु. बी. डोये यांनी केले तर आभार स. शिक्षिका यु. आर. बाच्छल मॅडम यांनी मानले.


 

Leave a Comment