महाराष्ट्र केसरी न्यूज च्या बातमीचा दणका… अन पोलीस विभाग लागले कामाला!


सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२३ : सौंदड गावात फोफावले अवैध वेवसाय आशीर्वाद कुणाचे? या मथडया  खाली दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र केसरी न्यूज ने बातमी प्रकाशित केली. त्या अनुसंघाने गोंदिया पोलिश विभागाने बातमीची तात्काळ दखल घेतली. दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी ग्राम सौन्दड येथे चालत अश्लेले एका अवैध रित्या दारू विक्रीच्या अड्यावर पोलिसांनी धाड टाकली असता आरोपी नामे आशिष शालीकराम राऊत यांचे राहते घरातुन १२७८० रुपयाची अवैध रित्या विक्री करीत अश्लेली विविध ब्रांडची देशी विदेशी दारू मिळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला.

हे ही वाचा : सौंदड गावात फोफावले अवैध वेवसाय आशीर्वाद कुणाचे?

दारू बंदी कायदा अन्वय गुन्ह्याची नोंद केली. सदर कार्यवाई निखील पिंगळे पोलीस अधिक्षक, अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, पो. हवा. जगदेश्वर विसेन, पोहवा मनलाल बाई, पोशि सुनिल डाहाके, मपोशि रागीनी निखारे, पोलीस स्टेशन डुग्गीपार यांनी केली आहे.


 

Leave a Comment