सौंदड गावात फोफावले अवैध वेवसाय आशीर्वाद कुणाचे?


सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिंनाक : 03 फेब्रुवारी 2023 : तालुक्यातील लोक संख्येने सर्वात मोठे असलेले गाव सौंदड आहे. या गावात अवैध व्यवसाय सध्या फोफावले आहे. गावात लपत छपत नाही तर खुले आम अवैध रित्या दारूचे बार चालतात. सांगायचं म्हणजे गावात देशी विदेशी दारूची दुकाने अशली तरी नजीकच्या साकोलीवरून गावात विक्री करीता देशी विदेशी आणि दुपलिकेट दारू ची खेप रोज आणली जाते. गावात मोहफुलाची दारू देखील मिळते. विशेष म्हणजे दारू दुकाने 12 तास चालत असली तरी गावात 24 तास दारूची विक्री होते. एवढच नाही तर कर्तव्यावर असलेले पोलिस विभागाचे कर्मचारी देखील येथे तासोंतास बसलेली अनेकांनी पाहिले.

गावात जवळपास 25 ठिकाणी दारूची विक्री केली जाते. याबद्दल आपकारी विभागाचे अधिकारी तुषार लव्हाडे आणि पोलिस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांना काही महिन्या पूर्वी आम्ही माहीती दिली होती. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही.

गावात अवैध दारू विक्री सह गांज्याची देखील विक्री केली जाते. जनावरांची तस्करी, वाळू उपसा, मुरूम उत्खनन, सट्टा पट्टी, जुव्वा सारखे वेवसाय चालतात.

काही लोक या वेवसायातून धनवान जरी होत असले तरी अन्य मजूर वर्ग बरबाद झाला आहे. गावात सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची देखील जोमात विक्री होते. बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू काही लोकांकडे स्टॉक मध्ये असते.

याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महिन्याला लाखो रुपये पगार घेणारे कथित अधिकारी आणि कर्मचारी हप्ते घेऊन अवैध व्यवसाय करण्यासाठी मुख संमती देत असल्याची चर्चा आहे.

गावातच नाही तर तालुक्यात देखील हेच चित्र आहे. त्या मुळे हा अवैध वेवसाय स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तर चालत नाही ना अशी चर्चा आहे. सौंदड गावात चालत असलेल्या अवैध वेवसाया मुळे शाळकरी मुले वेसणाधिन झाली आहेत. अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. त्या मुळे अश्या कारभाराला कायमचा बंद करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक ग्राम पंचायत ने पत्रकाराची पत्रकारिता रद्द करावी म्हणून मासिक सभेत ठराव मंजूर केला होता. तर 500 लोकांच्या खोट्या स्वाक्षरी करून त्याला तडीपार करावी म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. मात्र गावातील अवैध वेवसाय बंद करण्यासाठी कुठलाही ठराव पारित केला नाही. ही सोकांतिका आहे.


 

Leave a Comment