चिखलात फसलेले मामाचे ट्रॅक्टर, काढन्यासाठी गेलेला भाशा, ट्रॅक्टर खाली आल्याने जागीच ठार!

सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम तिडका येथील घटना. 

गोंदिया, दी. ०६ जुलै : सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वत्र भात पेरणीचे काम सुरू आहे. अशातच ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती मध्ये चिखल करण्याचे काम सुरू आहे. यंत्राच्या साह्याने शेती अधिकच सोपी झाली असली तरी ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये वाहन चालक मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अश्या प्रकारची घटना आज ०६ जुलै रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम तिडका येथे घडली असून ट्रॅक्टर चालक शेतकरी ट्रॅक्टर खाली दबून जागीच ठार झाला आहे.

ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम तिडका येथे घडली असून शेतकरी जयपाल अंबर पेटकुले यांच्या शेतात भात रोवणीचे काम सुरू असताना ट्रॅक्टरने शेतात चिखल सुरू होते. दरम्यान ट्रॅक्टर चिकलात फसले होते. वाहन चालक यांना वाहन निघत नशल्याने तितक्यात आपल्या शेतात खत घेऊन जात अशलेला पेटकुले यांचा भाषा महावीर फागु मोहूर्ले यांनी चिखलात फसलेले ट्रकटर बाहेर काढन्यासाठी प्रयत्न केले मात्र ट्रॅक्टर जागीच पलटी झाल्याने वाहन चालक भाषा महावीर फागु मोहूर्ले वय वर्ष 32 यांचे मृत्यू झाले. ही घटना आज दिनांक : 6 जुलै रोजी 11 वाजता दरम्यान घडली आहे.

ट्रॅक्टर क्रमांक : एम एच 40 एल 7570 असे आहे. घटनास्थळी डुग्गीपार पोलीस उपस्थित होते. घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल करण्यात आला आहे. मृतकाचे शव पोस्टमार्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालय सडक अर्जुनी येथे हलवण्यात  आले. झालेल्या घटणे मुळे ग्राम तिडका परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी जमवली होती. झालेल्या घटनेमुळे शेतकरी सावधान होतील का असेही दरम्यान बोललं जात आहे. यावेळी घटनेची माहिती शेतकरी कवींद्र मोहुर्ले, दुलीचंद तागडे, रेवतराम मांदाडे यांनी दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें