- दादालेारा खिडकी योजने अंतर्गत आधारकार्ड केले अपडेट
गोंदिया, दि. 29 सप्टेंबर : दादालेारा खिडकी योजने अंतर्गत दिनांक : 28 सप्टेंबर रोजी नक्षलग्रस्त ग्राम बाम्हणी/खडकी येथे डुग्गीपार पोलीसांच्या वतीने आधारकार्ड अपडेट करण्यासंबंधाने कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात मौजा बाम्हणी व आजु बाजुचे नक्षलग्रस्त गावातील 50 ते 60 महीला/पुरुषांनी सहभाग घेतला त्यापैकी 33 जणांचे आधारकार्ड अपडेट करण्यात आले.
सदर कार्यक्रम गोरख भामरे पोलीस अधिक्षक गोंदिया, नित्यानंद झा अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, ठाणेदार मंगेश काळे पो.स्टे. डुग्गीपार यांचे मार्गदर्शनात पोहवा मेश्राम, खोटेले, पो.ना. सोनवाने, रुखमोडे, मपोशि कोचे यांनी घेतले.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 300