- वाळू वाहतूक संदर्भात ठराव मंजूर केला व वृत्त पत्रात बातमी दिली म्हणून जबाबदार धरित दिली धमकी – नरेंद्र डोंगरवार यांचा आरोप
सडक अर्जुनी, दि. 04 ऑक्टोंबर : तालुक्यातील
रेंगेपार ग्राम पंचायतीने अवैधरित्या वाळू वाहतूकीवर कारवाई करण्या संदर्भात एक ठराव मंजूर केल्याने डोंगरगाव खजरी येथील एका वाळू वेवसाईकाने वृत्तपत्रात बातमी दिल्याच्या राग मनात धरून एका वेक्तिला अश्लील शब्दांचा वापर करीत भ्रमण ध्वनी वरून धमकी दिली आहे, तसा त्या संदर्भातील एक ऑडिओ देखील वायरल झाला आहे, तालुक्यातील वाळू माफियांची आता मुजोरी वाढली असून सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावे लागत आहे, असे असले तरी तालुक्यातील महसूल विभाग आणि पोलिस विभाग मात्र बग्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे, कारण पावसाने विश्रांती देताच तालुक्यातून पुन्हा रेती चोरीचे सत्र सुरू झाले आहे.
प्रकरण असे आहे की सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार ग्राम पंचायत ने उपस्थित नागरिकांच्या एक मताने गावातून होत असलेल्या अवैध रित्या वाळू वाहतूकीवर कारवाई करण्या संदर्भात आम सभेत सर्वांच्या संमतीने ठराव मंजूर केले होते, गाव तंटामुक्ती समितीचे सदस्य नरेंद्र डोंगरवार यांनी दिलेल्या माहिती नुसार ही आम सभा 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती, रेंगेपार गावा नजिक असलेल्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून वाळूची वाहतूक करणारे वाहन रात्रीला गावातून चालतात त्या मुळे गावकऱ्यांची झोप मोड होते, परिणामी गावातील नागरिक कैलाश डोंगरवार यांनी ग्राम पंचायत मध्ये एक पत्र लावत गावातून होत असलेली अवैध वाळू वाहतूक बंद करण्या संदर्भात ठराव मंजूर करण्यासाठी अध्यक्षांना विनंती केली या विनंतीला अध्यक्ष सह सर्व सदस्य व नागरिक यांनी एक मताने मंजुरी देत ठराव मंजूर केला.
या संदर्भात महाराष्ट्र केसरी न्युज च्या वेब पोर्टल वर वृत्त देखील प्रकाशित झाले होते, मात्र वाळू वाहतूक करण्या संदर्भात ठराव मंजूर केला व वृत्त पत्रात बातमी दिली म्हणून याचा राग मनात धरून गावा नजीक असलेल्या एका वाळू माफियानी नरेंद्र डोंगरवार याला जबाबदार धरीत भ्रमण ध्वनी वरून संपर्क करीत अश्लील शब्दांचा वापर करीत धमकी दिली आहे.
नरेंद्र डोंगरवार यांनी दिलेल्या माहिती नुसार ऑडिओ मध्ये बोलत असलेली वेक्ती हे डोंगरगाव खजरी येथील रहिवाशी आहेत आणि त्यांचा वाळू चोरीचा वेवसाय आहे, टिकू शेंडे असे त्यांचे नाव असून यांच्या पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तर नरेंद्र डोंगरावर यांनी शेंडे यांच्यावर आरोप केले आहेत.
तर या संदर्भात आपण पोलिस स्टेशन मध्ये त्यांची तक्रार देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. तालुक्यात वाढत्या गुन्हे गारिला लक्ष्यात घेता अश्या मुजोर आणि बंडखोर लोकांना पोलिसांनी तडीपार केले पाहिजे असे मत या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर त्या वायरल ऑडिओ रेकॉर्डिंग मधील काही भाग आम्ही आपल्याला व्हिडिओ बातमी मध्ये एकूण दाखवत आहोत, त्याच बरोबर या ऑडिओ बाबद आम्ही कुठलाही दावा करीत नाही, मात्र नरेन्द्र डोंगरवार यांनी दिलेल्या माहिती नुसार हे वृत्त प्रकाशित करण्यात येत आहे. याची वाचकांनी दखल घ्यावी.
टेकू शेंडे, वाळूव्यापारी – डोंगरगाव/ख.
मी त्याला शिवी गाळी दिली नाही, त्याच्यावर माझे 60 हजार रुपये होते त्यांनी 5 हजार रुपये आहे असे म्हणत माझे पैसे मला दिले आहेत. त्या संदर्भात मी त्याच्याशी बोललो होतो पण कुठलीही शिवी व धमकी दिली नाही.