प्रफुल भाई ! यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी द्यावं लागतो पैसा : व्हिडिओ व्हायरल !

  • जन सन्मान यात्रे दरम्यान आलेली भिड पैशाने बोलाविण्यात आली!
  • महिलांना 300 रूपये, पुरुषांना 600 रूपये मजुरी!
  • पैसे न मिळाल्याने नागरीक झाले आक्रमक, व्हिडिओ झाला वायरल!

गोंदिया, दि. 30 सप्टेंबर : भंडारा – गोंदिया जिल्ह्याचे किंग मेकर समजल्या जाणारे प्रफुल भाई यांच्या नावाने आता जनता सुध्दा यायला तयार नाही, भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास मिच करू शकतो अशी बतावणी भासणातून करतात, तर वरिष्ठ स्तरावर आपल्या जिल्ह्यात आपली चालते अशी ग्वाही देखिल प्रफुल भाई पटेल करताना दिसतात, पण जिल्ह्यात पटेल यांना मात्र नागरीकाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळतं नाही, त्या मुळे त्यांच्या सभेला रोजंदारीने लोकांना बोलावण्यात आले आहे, त्यांच्या सभेच्या ठिकाणी पैसे वाटतानाचे व्हिडिओ देखील समोर आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित दादा पवार गटांची जन सन्मान यात्रा दि. 28 सप्टेंबर रोजी पोहचली होती. या सभेत हजारोच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते, यावेळी मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार प्रफुल भाई पटेल, आमदार राजू कारेमोरे सह अनेक दिग्गज नेते मडळी उपस्थित होते. कार्यक्रम संपताच पत्रकारांनी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता लक्षात आलें की महिलांना 300 रूपये व पुरुषांना 600 रूपये देऊन सभेला आणण्यात आले. त्यावरून असे लक्षात येते की ही जमलेली भिड पैशाने बोलावण्यात आली होती.

एकीकडे महायुती सरकार आपले चांगले काम मोजत असताना मात्र यांना एकण्यासाठी आणलेली जनता पैशाने आणली होती. शेवटीं नागरीकांना पैसे न मिळाल्याने महीला व पुरुष आक्रमक झाले होते. तर नागरीकांना पैसे वाटप करताना चे व्हिडिओ मोबाइल मध्ये कैद झाले आहेत.

https://x.com/Awhadspeaks/status/1840080817323655244?t=wTYwCtO_z7ly58eBRr_duQ&s=09

प्रफुल भाई पटेल आपल्या भाषणामध्ये भंडारा गोंदिया येथील नेत्यांची अवकात काढायला कधी मागे पुढे पाहत नाही, मात्र त्यांच्या सभेला रोजंदारीने लोक आणावे लागत असतील तर यापेक्षा दुर्दैव नाही, विशेष सांगायचं म्हणजे कार्यक्रम दरम्यान वाटण्यात आलेले पैसे त्याचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून काही नेत्यांनी देखील x वर पोस्ट केला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, प्रफुल भाई पटेल आणि आमदार राजु कारेमोरे यांची गोची झाली आहे, या सभेला प्रचंड मोठा गर्दी दिसत होती दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपस्थित होते, येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील नेते या प्रकाराला अधिकच उजेडात आणतील हे मात्र तितकच सत्य आहे. त्याचबरोबर आमदार राजू कारेमोरे यांचा एक ऑडिओ देखील नुकताच वायरल झाला असून त्यात ते एका महिलेला धमकावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या भागात राष्ट्रवादी पक्षासाठी आता अग्निपरीक्षा सुरू झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वायरल व्हिडिओ बाबत प्रफुल पटेल यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सारवा सारव केली.

 

Leave a Comment

और पढ़ें