लोहिया विद्यालयात संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांचा वाढदिवस साजरा

  • तालुक्यातील पत्रकारानीं दिल्या जन्मदिनाच्या शुभेच्छा…

सौंदड, दि. 29 सप्टेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा व लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने लोहिया, शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष, जगदीश लोहिया यांचा वाढदिवस आज दि. 29 सप्टेंबर रोजी लोहिया शाळेत साजरा करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने काँग्रेस कमिटी गोंदियाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड, लोहिया शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष सुरेशकुमार लोहिया, संस्था उपाध्यक्ष आ.न. घाटबांधे, मधुसूदन दोनोडे, संस्था सचिव पंकज लोहिया, परेश लोहिया, मनीष लोहिया, प्रेमलता लोहिया, पारुल पंकज लोहिया, स्नेहा परेश लोहिया, लोहिया परिवारातील सन्माननीय सदस्यगण, विजय अग्रवाल, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी चिंतामण थेर, सेवानिवृत्त प्राचार्य ए .पी .मेश्राम, सहसचिव एम.एन. अग्रवाल, रामचंद्र भेंडारकर, प्राचार्या उमा बाच्छल, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी.एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर.एन. अग्रवाल तसेच महाराष्ट्र केसरी न्यूज चे संपादक बबलू मारवाडे, एम.के.एम. न्युज चे संपादक सुशील लाडे, नवभारत न्युज पेपरचे तालुका प्रतिनिधी शाहिद पटेल सह अन्य उपस्थित होते.

जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष यांना वाढदिवसानिमित्त दिलीप बंसोड, प्रेमलता लोहिया,
मधुसूदन दोनोडे, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी चिंतामण थेर, ए. पी. मेश्राम तसेच प्राचार्या उमा बाच्छल, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे विद्यालयातील सहाय्यक शिक्षक, टी. बी. सातकर आणि मित्रमंडळींनी भावी जीवनाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या.

तसेच निमंत्रितांनी भेटवस्तू दिल्या. या प्रसंगी कणव पंकज लोहिया यानी गीत गाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जगदीश लोहिया संस्थापक संस्था अध्यक्ष यांनी वाढदिवसाला उपस्थित सर्व निमंत्रित मंडळी मित्रपरिवार सदस्य यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी मला शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाली याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो असे मत जगदीश लोहिया यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

और पढ़ें