राजकिय नेत्यांना गावबंदी, निवडणुकीवर बहिष्कार, बॅनर लावत केला नेत्यांचा निषेध!

भंडारा, दि. 30 सप्टेंबर : भंडारा जिल्ह्यातील सिंदीपार गावात नागरिकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तर चुकीने देखील कुठलाही राजकीय नेता गावात फिरकला तर त्याच्या गाडीच्या काचा फोडणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील ग्राम सिंदीपार येथे जाण्यासाठी दोन किलोमीटर रस्ता अक्सरसा फुटलेला आहे, याच रस्त्यावरून गावकरी, शाळकरी मुले, गरोदर महीला, रूग्ण, मुख्य रस्त्याला जात असतात मात्र खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा अपघात झालेला आहे. या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांना निवेदन देऊन देखील अजूनही गावाला पक्का रस्ता नसल्याने आता येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संपूर्ण गावकऱ्यांनी घेतला आहे. कोणत्याही पक्षाच्या राजकीय पुढार्‍यांना गावात फिरकू देणार नाही असं बॅनरच गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर लावलेला आहे.

तर शाळकरी मुले देखील आपल्या आई वडिलांना मतदान करायला जाऊ नका अशा सल्ला देत आहेत. दरम्यान सतीश बिसेन, सरपंच, जयश्री बडोले, गावकरी, नयना कावळे, विद्यार्थिनी, श्रावणी बीसेन, विद्यार्थीनी, ललित येळे, प्यारेलाल येळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. गावाच्या वेशीवर लावलेल्या बॅनरमुळे चुकीनेही कुठलाही राजकीय नेता गावामध्ये फिरकला तर त्याच्या गाडीच्या काचा फोडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे प्रत्येक निवडणुकीत राजकीय पुढारी गावात येऊन मोठ्या मोठ्या बतावण्या करतात पण गावकऱ्यांचे रस्त्या संदर्भातील प्रश्न अजूनही सुटलेले नाही.

काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे या गावात आले असताना गावकऱ्यांनी त्यांच्या समोर देखील रस्त्याचा पाळा वाचला होता व येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार असल्याचाही नाना पटोले यांच्याच समोर गावकऱ्यांनी म्हटलं होते, तरी देखील नाना पटोले यांनी या गावाला अजूनही पक्का रस्ता दिला नाही. आता संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आमदार खासदार यांच्याविरुद्ध नारेबाजी लावत गाव बंदी केली आहे. एकीकडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावे असे स्वप्न पाहत असलेल्या नाना पटोले यांच्याच मतदारसंघात आता नागरिकांनी बहिष्करांच हत्यार उपसलेला आहे. त्यामुळे आपल्याच मतदारसंघातील जनतेला नाना पटोले कसे समोर जातात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें