प्रफुल पटेल यांना धक्का, राष्ट्रवादीचे नेते अजय लांजेवार 6 हजार कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात 

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत, क्षप्रवेश सोहळा संपन्न. 

सडक अर्जुनी, (  बबलु मारवाडे )  दि. 07 जुलै : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते अजय लांजेवार यांनी नाना पाटोले यांच्या उपस्थितीत कॉग्रेस पक्षात आज दि. 07 जुलै रोजी प्रवेश केला कॉग्रेस पक्षाच्या वतीने सडक अर्जुनी तालुक्यात नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार नामदेव किरसान आणि कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांचे नागरी सत्कार करण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणुका पाहता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात कॉग्रेस पक्षाच्या वतीने कोण विधानसभा निवडून लढणार हे जरी आज निश्चित झाले नसले तरी या मतदार संघात बऱ्याच लोकांनी दावेदारी पक्षा कडे केली असल्याने ज्या लोकांच्या सोबत जण आधार असेल त्याच व्यक्तीला मी विधानसभा निवडणुकीची तिकीट देणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले म्हणाले आहे.

तर आज तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने सडक अर्जुनी तालुक्यात कार्यकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून नुकतेच कॉग्रेस पक्षात प्रवेश केलेले कॉग्रेस पक्षाचे नेते अजय लांजेवार यांनी शक्ती प्रदर्शन दाखवीले आहे. यावेळी मोठ्या संख्येत कॉग्रेस कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजय लांजेवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जवळपास 5 ते 7 हजार कार्यकर्त्यांसह त्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्र मध्ये बहुजनांचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांना आपण साथ देऊ तसेच पत्रकारांनी विचारले की येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट मिळाल्यास आपण आमदारकी लढणार का ? त्यावर ते म्हणाले की नानाभाऊ आपल्याला जे आदेश करतील त्याचे आपण पालन करणार आणि बहुजनांच्या नेत्याला आपण साथ देणार

कोण आहेत अजय लांजेवार ? 

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून अजय संभाजी लांजेवार हे अनेक वेळा आमदारकीसाठी उभे झाले होते. ते भाजप आणि राष्ट्रवादी पक्षा मध्ये देखील सक्रिय कार्यकर्ते होते, तसेच त्यांची स्वतंत्र संघटना आहे, तर ते एस. चंद्रा ग्रुप चे संचालक – अध्यक्ष आहेत, असे असले तरी त्यांना पाहिजे तस यश मिळाले नाही. 2019 च्या निवडणुकीमध्ये अजय लांजेवार हे वंचित बहुजन आघाडी या पक्षातून उमेदवार म्हणून उभे झाले होते. त्यांनी 29 हजार च्या जवळपास मतदान घेतलं होतं. दरम्यान अजय लांजेवार यांच्या मुळेच भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन माजी मंत्री राजकुमार बडोले यांना हार चा सामना करावा लागला होता, तर त्याचाच फायदा मनोहर चंद्रिकापुरे यांना झाला होता, चंद्रिकापुरे हे जवळपास 717 मतांनी विजयी झाले होते.

अजय लांजेवार यांना पुन्हा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्ष तिकीट देणार आणि ते भरघोस मतांनी निवडून येणार असा विश्वास काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये अजूनही अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची तिकीट कोणाला द्यायची आणि कोण उमेदवार असणार हे निश्चित झाले नाही, त्यामुळे अजय लांजेवार यांचे आमदार बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल.

सध्या तरी देशामध्ये काँग्रेस पक्षाची हवा आहे, आणि या हवेचा फायदा, अजय लांजेवार यांना होऊ शकतो, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून अजय लांजेवार यांना उमेदवारी मिळाल्यास अजय लांजेवार यांना 2024 – 25 मध्ये आमदार होण्यास कोणीही रोखू शकणार नाही, एकीकडे काँग्रेस पक्षाची हवा, दुसरीकडे अजय लांजेवार यांच्यासोबत असलेला कार्यकर्त्यांचा जनसमुदाय तसेच नाना पटोले यांच्या पाठीमागे असलेला कार्यकर्त्यांचा आणि सामान्य जनतेचा आशीर्वाद नक्कीच अजय लांजेवार यांना भरघोस मतांनी विजय करू शकतोय. 

मात्र अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते येत्या निवडणुकी करिता, बाशिंग बांधून उमेदवारी मागत असल्याचे चित्र आहे, आणि त्यामुळेच कुठेतरी काँग्रेस पक्षामध्येच फूट पडल्याची ही चर्चा आहे, या संबंधित काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ बनसोड यांना आम्ही विचारले असता त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची फुट नाही, तसेच काँग्रेस पक्षामध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही स्वागत करतोय आम्हाला पक्ष मोठा करायचा आहे, तिकीट वाटपाचा अजून कुठलाही कार्यक्रम निश्चित झाला नसून पक्ष जी जबाबदारी ज्यांना देईल ते पक्षातील कार्यकर्ते पार पाडतील असे त्यांनी सांगितले आहे.

परंतु येत्या काळात काँग्रेस पक्षामधे काय घडामोडी होतील हे पाहण्यासारखे असेल, विशेष सांगायचं म्हणजे येत्या काळामध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही मोठे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, ही माहिती विश्वसनय सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट शिल्लक राहणार की नाही अशी देखील भीती व्यक्त केली जात आहे. 

 

Leave a Comment

और पढ़ें