सौंदड येथील जिल्हा परिषद च्या मुख्य मार्गाची दयनीय अवस्था!

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 04 जुलै : सौंदड येथील बरबाद चौक जवळून गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर गेली अनेक वर्षे पासून खड्डे पडले आहेत. जवळच जिल्हा परिषद ची शाळा आहे. मुख्य मार्गावर पडलेल्या खड्यानमध्ये पावसाळ्यात पाणी भरते त्या मुळे चिखल देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. परिणामी या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना मार्ग सोधत जावे लागते, आंबेडकर वार्ड, पटेल वार्ड येथे राहणाऱ्या नागरिकांना जान्या येण्यासाठी हा एकच मार्ग आहे.

हा मार्ग जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येत असून सौंदड येथून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 पासून ते ग्राम पिंपरी या गावाकडे जाते, हा मार्ग गेली अनेक वर्षे पासून अनेक ठिकाणी फुटला असून या मार्गाचा कासव गतीने विकास सुरू आहे. त्या मुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक विकास कामे दुर्लक्षित ? 

हाच नाही तर सौंदड येथील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाची देखील दयनीय अवस्था असल्याचे चित्र आहे. सौंदड जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्राम फुटाळा येथील सौंदड ते फुटाळा या मार्गाची दयनीय अवस्था गेली अनेक वर्ष पासून झाली आहे. मात्र याकडे स्थानिक लोक प्रतिनिधी यांचे दुर्लक्ष आहे. महाराष्ट्र केसरी न्यूज ने वृत्त प्रकाशित करून सदर मार्गाची दयनीय अवस्था असल्याचे अनेक वेळ सांगितले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

तसेच सौंदड ते पळसगाव या मार्गावर नदीपात्रातून पुलाची निर्मिती व्हावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. सौंदड ते राका या मार्गावर नदी पात्रातून पुलाची निर्मिती व्हावी अशी मागणी आहे. त्याच बरोबर याच मार्गावर असलेले कोल्हापुरी बंधाऱ्याचे कठडे गेली अनेक वर्षे पासून गायब झाले आहेत. त्या मुळे प्रवाश्यांना या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

या अरुंद पुलावर लोखंडी कठडे लावण्याची देखील मागणी होत आहे. सौंदड जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत अनेक विकास कामे रखडली आहेत. असे असले तरी स्थानिक लोक प्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्या मुळे आता तरी लक्ष वेधून कामे करण्याचा प्रयत्न करतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें