- सोयी सुविधा न दिल्यास विधानसभा निवडणुकी अगोदर पुन्हा आमरण उपोषणाची तयारी.
- आमदार कोरोटे यांच्या विरोधात चुबंली गावातील नागरिकांचा रोष!
देवरी, दि. ०६ जुलै : चुबंली गावातील नदीवर देवरी तालुका रा.कॉ. शरदचंद्र पवार पक्षातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन ०५ जुलै रोजी करण्यात आले, ज्यात देवरी तालुका रा.कॉं. शरदचंद्र पवार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते तर चुंबली गावातील सुमारे 250 नागरींकानी जिल्हा प्रशासन व स्थानीक आमदार याचां विरोध करत चुंबली नदीवर नारेबाजी करीत आंदोलन केले.
तर येत्या विधानसभा निवडणुकी अगोदर चुंबली नदीवर पूल व गावात जाण्यास रस्ता तयार झाला नाही तर, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत मतदान करणार नसल्याचेही चुंबली वाशीयानीं सांगीतले आहे.
वर्ष २०२२ या वर्षी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व स्थानीक आमदार कोरोटे यांनी या गावात हजेरी लावत परिस्थितीचा आढावा घेतला होता, लवकरच या ठिकाणी एक पूल तसेच रस्ता बांधून देऊ, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते. पंरतु, दोन वर्षे लोटुनही प्रशासन व स्थानीक आमदार कोरेटे यांनी दिलेले आश्वासन पुर्ण न करता दिलेले आश्वासन फोल ठरले.
त्याचाच विरोध म्हणुन चुंबली वाशीयांना पाठिबां देत देवरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन चुबंली नदीवर दि. ०५ जुलै २०२४ रोज शुक्रवारला एक दिवसीय धरणे आंदोलन करत जिल्हा प्रशासन व आमदार यांचा निषेध दर्शवण्यात आला. नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त व आदिवासी बहुल असलेल्या मगरडोह ग्रामंपचायत हद्दीतील चुंभली गावात ना रस्ता ना नदीवर पूल आहे.
ज्यामुळे दरवर्षी नदी ओलांडतानी अनेकानां आपले जिव गमवावे लागत आहे. याचाच आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व स्थानीक आमदार कोरोटे यानीं वर्ष २०२२ मध्ये 4 कि.मी. चिखलातून पायपीट करीत पाहणी केली होती. परंतु आज ही चुंबली गावातील लोकाना स्थानीक प्रशासन व आमदाराने दिलेले आश्वासन जैसे थे स्थितीत आहेत.
दोन वर्षे लोटली असली तरी चुंबलीवाशीयाना आश्वासनावरच कायम रहावे लागले आहे. पंरतु ५ जुलैला झालेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाने प्रशासनाने टोकाची भुमीका घेत पुन्हा चुंबलीवाशीयाना आश्वासन देत नदीवर पुल व गावात जाण्यासाठी रस्ता तयार करुन देऊ याचे आश्वासन देत येत्या ९ जुलै रोजी शिष्ट मंडळाची बैठक उपविभागीय कार्यालय देवरी येथे आयोजीत केली आहे.
प्रशासनाने घेतली दखल : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व चुंबली गावातील नागरीकांच्या आंदोलनाची दखल घेत आंदोलन स्थळ गाठत प्रशासनाच्या प्रतिनीधिनी चुंबलीवाशीयांचे म्हणणे ऐकून घेतले. व यावर पक्षाचे व गावातील शिष्टमंडळासोबत संबधित विभाग व प्रशासनाची बैठक घेऊन यावर तोडका काढण्याचे आश्वासन देत धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसे पक्षातील पदाधिकारी व चुंबलवाशीयानी आंदोलन मागे घेतले. त्यावर उपविभागीय अधिकारी देवरी यानीं दि.९ जुलै रोजी या संदर्भात चुंबली गावातील, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षातील व प्रशासनाचे निवडक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकिचे आयोजन केले आहे.
आमदारांच्या प्रतिनीधिची गैरहजेरी : एकदिवसीय धरणे आंदोलनात गावातील २५० हुन अधिक नागरीकानीं हजेरी लावली. पंरतु, आमदार कोरोटे यांचे एकही प्रतिनीधी उपस्थित न झाल्याने गावातील नागरीकांत आमदार कोरोटे यांच्या विरोधात चांगलीच नाराची दिसुन आली. तर गावातील नागरीकांनी चुंबली गावात पुल व रस्ता तयार झाला नाही तर, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत मतदान न करण्याचेही बोलुन दिले आहे.
९ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांनी बोलावली बैठक : देवरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व चुंबली गावातील नागरीकाकडुन चुंबली नदीवर केलेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने शिष्ट मंडळाची बैठक दि. ९ जुलै रोजी देवरी उपविभागीय कार्यालयात आयोजीत केली आहे. यावर आतातरी चुंबलीवाशीयांच्या आंदोलनाला यश प्राप्त होतोय की पुन्हा आश्वासनावरच कायमच राहत चुंबली नदी ओलांडतानी आपले जिव गावातील नागरीकांना गमवावे लागते याकडे तालुक्यासह जिल्हावाशियांचे लक्ष लागले आहे.