आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करताना मिथुन मेश्राम
सडक अर्जुनी, दि. ०६ जुलै : महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने ५ रुपये बोनस देण्याचे ठरविले आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात दुध संघ मागील ७ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रायव्हेट दुध केंद्रावर दुध विक्री करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळत नाही.
हि बाब सरकार च्या लक्षात आणून द्यावी म्हणून आज दिनांक : ३ जुलै २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालय मुंबई येथ आमदार रोहित पवार यांना भेटुन निवेदन देण्यात आले.
यावेळी यशवंत परशुरामकर सभापती बाजार समिती अर्जुनी मोरगाव, सौरभ रोकडे जिल्हा अध्यक्ष, दिनेश कोरे तालुका अध्यक्ष, आशिष येरणे युवक जिल्हाध्यक्ष, मंजु डोंगरवार महिला अध्यक्ष, मंजु वासनिक जिल्हा कार्याध्यक्ष, देवानंद तागडे जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग गोंदिया, तिरथ येटरे महासचिव, बालु वंजारी आदी उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यातील दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील बोनस चे पैसे मिळावे अशी अपेक्षा मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी केली आहे.