हर्ष मोदी यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
प्रतिनिधी / गोंदिया, दि. 06 जुलै : ओबीसी आरक्षण, ओबीसी समाजाची जनगणना, ओबीसी विषयांची विविध मुद्द्यांवर ओबीसी विकास मंत्री मा. छगन भुजबळ यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून ग्राम पंचायत सारख्या स्वायत्त संस्थानांचे प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करून येत्या काळात महाराष्ट्रातील सामान्य आणि विशेषकरून ग्रामीण जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सौंदड ग्राम पंचायत चे सरपंच हर्ष मोदी यांनी भेट घेऊन आग्रह केल्याची माहिती दिली आहे.
प्रदीर्घ चर्चेत समाजातील विविध प्रश्न आणि ग्राम पंचायत स्तरावर कार्य करताना येणारी प्रश्न यावर मा. छगन भुजबळ यांनी केलेले मार्गदर्शन उल्लेखनीय होते. त्यावर अंमलबजावणी करण्यासंबंधी आश्वासन देवून ग्रामीण क्षेत्रातील ओबीसी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन देवून नवीन उर्जा घेवून आलो.
लवकरच ओबीसी समाजासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी माहिती मा. मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्याचे हर्ष मोदी म्हणाले, त्यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार परिनय फूके, बाळाभाऊ अंजनकर, आमदार विनोद भाऊ अग्रवाल यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार वेक्त केले आहे.