अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावा कायम!

सडक अर्जुनी, दि. 04 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेश कार्यालय येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक दि. 03 जुलै रोजी संपन्न झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात हे बैठक मुंबई येथे प्रदेश कार्यालयात घेण्यात आली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेत रोहित पवार, महबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र हा अनुसूचित जाती करिता राखीव आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यात होती, 2024 च्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे राष्ट्रवादीच्या कोट्यात राहणार असून जोमाने कामाला लागा असे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

यावेळी यशवंत परशुरामकर प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम, जिल्हा युवक अध्यक्ष आशिष येरणे, महिला जिल्हाध्यक्ष मंजू डोंगरवार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष देवानंद तागडे, तालुकाध्यक्ष दिनेश कोरे, सहर अध्यक्ष दिलीप गबने, जिल्हा महासचिव तीरथ येटरे, बालु वंजारी, मंजु वासनिक, शालू पंधरे, अंकुश शिवणकर, शेखर चामट, अक्की अग्रहरी, मुनिस पंचेश्वर, राजू लाडसे घनश्याम रहांगडाले, चेतन यावलकर, अखिल यावलकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे हे अर्जुनी मोरगाव विधानसभेच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष यांनी दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें