सडक अर्जुनी, दि. 04 जुलै : केंद्र सरकारने तीन नवीन फौजदारी कायदे संमत केले असून त्यांची अंमलबजावणी दिनांक 01/07/2024 पासून करण्यात आली आहे. या अनुषंगाने पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रात नवीन फौजदारी कायद्याबाबत पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांची कार्यशाळा आयोजित करून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले तसेच सर्व बीट अंमलदार यांना त्यांच्या बीट मध्ये पाठवून शाळा, कॉलेज तसेच गावा गाव मध्ये जनजागृती करण्यात आली.
पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे ठाणेदार मंगेश काळे यांनी पोलीस पाटील, सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांची कार्यशाळा घेऊन नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली.
सफौ निर्वान, पोहवा खोटेले, इस्कापे, उईके, कोटांगले, राऊत, पोना रामटेके, डोंगरवार यांनी मौजा खोडशिवनी, डव्वा, कनेरी, सौंदड, डुग्गीपार, धानोरी, पांढरी, गोंगले, येथील ग्रामपंचायत तसेच चौका-चौकामध्ये लोकांना एकत्रित करून त्यांना नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली.
पोउपनी इलमे, पोना सोनवाने, डहाके, मुळे यांनी आयटीआय कॉलेज सडक/अर्जुनी, जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा सडक/अर्जुनी, फुलीचंद भगत हायस्कूल कोसमतोंडी मधील विद्यार्थ्यांना नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली.