भोजराम हूड, सिंधू सूर्यवंशी, मुनेस्वर, झोडे यांना पदोन्नती तर गोबाडे, लंजे नव्याने रुजू

तालुक्यात 63 ग्राम पंचायतीचा भार 41 अधिकाऱ्यांच्या खांद्यावर, त्यातील 7 पदे रिक्त! 

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 04 जुलै : पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या 3 ग्राम पंचायत सौंदड, पांढरी, डव्वा येथील ग्रामविकास अधिकारी यांची पदोन्नती झाल्याने तसेच कोकणा व कोसमतोंडी या 2 ग्राम पंचायत येथील ग्रामसेवक यांची बदली झाल्याने रिक्त असलेले एकूण 5 पदावर फेरबदल झाले आहेत.

हे ही वाचा : चुलबंद नदीला पानी आल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाप गेले धूवून!

ग्राम पंचायत कार्यालय पांढरी व डव्वा या दोन्ही ग्राम पंचायतीचा कारभार भोजराम हूड ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे होते. ते देवरी पंचायत समिती येथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून त्यांची नुकतीच पदोन्नती झाली आहे. त्यांची पदोन्नती झाल्याने दोन्ही ग्राम पंचायत चे पद रिक्त झाले. त्यांच्या रिक्त जागेवर सिंधू सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. ते घाटबोरी कोहळी येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होत्या, त्यांची नुकतीच 27 जुन रोजी पदोन्नती झाल्याने ते आता ग्राम विकास अधिकारी म्हणून डव्वा ग्रामपंचायत येथे रुजू झाल्या आहेत.

तर भास्कर झोडे हे ग्राम पंचायत कार्यालय पांढरी येथे नव्याने रुजू झाले आहेत. ते अर्जुनी मोरगाव तालुक्यात ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. त्यांची नुकतीच पदोन्नती झाल्याने ते ग्रामविकास अधिकारी म्हणून ग्राम पंचायत पांढरी येथे त्यांची नियुक्ती झाली आहे. तसेच गणेश मुनेश्वर हे ग्राम विकास अधिकारी या पदावर ग्राम पंचायत सौंदड येथे कार्यरत होते. त्यांची विस्तार अधिकारी म्हणून पंचायत विभाग सालेकसा पंचायत समिती येथे पदोन्नती झाली आहे.

तर त्यांची पदोन्नती झाल्याने सौंदड ग्राम पंचायत येथील ग्राम विकास अधिकारी पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे कामे थांबू नये याकरिता व्ही. के. गोबाडे ग्रामसेवक यांची तात्पुरता नियुक्ती करण्यात आली आहे. ते देवरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेले ग्राम शिरपूरबांध येथे कार्यरत होते. कोसमतोंडी ही ग्रामपंचायत त्यांना मुख्यालय देण्यात आली आहे. अतिरिक्त कार्यभार म्हणून सौंदड ग्रामपंचायत त्यांच्याकडे आहे.

तसेच डी.डी. लंजे हे ग्राम पंचायत कार्यालय कोकणा जमी. येथे नव्याने रुजू झाले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी ग्राम पंचायत मध्ये ते ग्रामसेवक या पदावर कार्यरत होते. त्यांची बदली झाल्याने ते आता सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणारे ग्राम पंचायत कोकणा येथे नव्याने रुजू झाले आहेत, येथे सारिका राऊत या ग्रामसेवक होत्या.

एकूण 7 अधिकाऱ्यांची पदे रिक्त

सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत एकूण 63 ग्राम पंचायत आहेत, यामध्ये गट ग्रामपंचायत चा देखील समावेश आहे. ग्राम विकास अधिकारी यांचे एकूण मंजूर पदे 3 आहेत, यामध्ये सौंदड , डव्वा , पांढरी असे असून भरलेली 2 पद आहेत तर सौंदड ग्राम पंचायत येथील ग्राम विकास अधिकारी यांचे पद रिक्त आहे. तर ग्रामसेवक यांची एकूण 38 मंजूर पदे आहेत, यातील 32 पदे भरलेली असून 6 रिक्त पदे आहेत, असे एकूण 7 अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ग्रामसेवकांकडे अतिरिक्त ग्रामपंचायत चा कार्यभार आहे. विशेष म्हणजे काही ग्रामसेवकांच्या खांद्यावर 3 ते 4 ग्राम पंचायतीचा भार आहे.

सडक अर्जुनी येथील बिडीओ रविकांत सानप यांना आम्ही विचारले की तालुक्यात 63 ग्रामपंचायती आहेत. त्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचे 41 पद असल्याने अनेक ग्राम सेवक यांच्या खांद्यावर अतिरिक्त ग्राम पंचायत चा भार वाढत असल्याबाबत आम्ही विचारले, त्यावर ते म्हणाले लोकसंख्येच्या आधारावर शासनाने निकष ठरवून ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांचे पद नियुक्त केले आहे, त्यामध्ये आम्ही कुठलाही बदल करू शकत नाही, मात्र रिक्त असलेले पद भरण्यासाठी वरिष्ठांना माहिती पाठवली आहे. रिक्त पद लवकरच भरले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें