तालुक्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई कधी होणार?


  • डूग्गीपार पोलिसांचे दुर्लक्ष्… 

सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिंनाक : 03 फेब्रुवारी 2023 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरच्या वाहन धारकांवर पोलिस विभाग कारवाई कधी करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात धूम ठोकत अनेक वाहन धारक दुचाकी वाहने चालवतात. अश्या वाहन चालविणाऱ्या वाहणा मुळे ध्वनी प्रदुषण अनियंत्रित झाले आहे.

अनेक वाहन धारक आपल्या दुचाकी वाहनाला मॉडिफाईड करून दुसरे सायलेंसर लावतात. टरटर आवाज करीत वाहने चालवितात. शाळेची सुट्टी झाल्यावर काही वाहन धारक मुलींना पाहून रस्त्याने सुसाट वाहन चालवतात.

कर्णकर्कश आवाज मुळे शाळकरी मुले, बुजुर्ग नागरिक रस्त्याने चालताना दचकतात अश्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे पोलिस विभागाने अश्या वाहन धारकांवर मोटार वाहन कायद्यातील १९० (२) नुसार जबर दंड बसवायला पाहिजे. तेव्हा दुचाकी चालकांना कायद्याचा धाक राहील. सुसाट वाहन चालविणाऱ्या वाहन धारकांना कायद्याचा धाक राहिला नसल्याने पोलिस विभागाला जुमानत नाही. असे काहीसे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.


 

Leave a Comment