कुणबी समाज भवनासमोर स्थानिक प्रशासनाची दलीन्दरी


सडक अर्जुनी, दिनांक : ३१ जानेवारी २०२३ : तालूक्यातील ग्राम पंचायत सौन्दड हे जिल्ह्यात नावजलेली आहे. गावात विकासाच्या नावावकर कागदावर बिले काढण्याचा सपाटा लाऊन जनतेला भ्रमित करण्याचा सपाटा लावला गेल. त्यावर काही सामाजिक कार्यकर्ते यांनी माहितीचा अधिकार लावल्यावरही इमानदार अधिकारी यांनी मागितलेली माहिती गेली पाच वर्षात दिली नाही. काम न करता चुक्कार प्रशासन जनतेला फक्त आश्वासन देऊन. दिवस काढण्याचा कारभार गेली पाच वर्ष काढला आहे. गावात स्वछता अभियनचे तीन तेरा वाजले आहेत. गावातील धुकी माता परिसरात देशी दारूची भट्टी अश्ल्याने या मार्गावर दारूड्यांची रोज जणू जत्रा भरते. महिलांना या ठिकाणावरून जाण्यासाठी भीती वाटते. हे ठिकाण सद्या भीती दायक झाले आहे.

त्यातच या ठिकाणी कुणबी समाजाचे समाज मंदिर आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती समोर रोज मासे कापली जातात. कोंबड्या कापल्या जातात. त्यातच त्यांची घाण त्याच ठिकाणी फेकली जाते. ज्या संतानी समाज जागृतीचे कार्य सातत्याने करून आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचा रोज घोर अपमान होत आहे. मार्गाच्या बाजूला अश्लेल्या नालीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेली पाच वर्षे या नाल्या स्वछ केल्या की नाही. असे चित्र निर्माण झाले आहे. अनेक बातम्या लाऊन सुधा गेंड्याच्या कातडीचे प्रशासन यावर कुठीली कार्यवाई करीत नाही. स्थानिक प्रशासनाने गावात दलीन्दरी पसरवली असून नवनिर्वाचित सरपंच यांनी कुणबी सामाजातील लोकांच्या भावना समजून घ्यावा व सदर ठिकाण स्वछ करावा. अन्यथा कुणबी समाज गप्प बसणार नाही. असे मत समाजातील जागरूक युवकांनी वेक्त केल आहे.


 

Leave a Comment