जनसेवा बहुद्देशीय विकास संस्था सौंदड च्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम थाटात संपन्न.


सौन्दड, दिनांक : ३१ जानेवारी २०२३ : जनसेवा बहुद्देशीय विकास संस्था सौंदड द्वारा संचालित तसेच हर्ष मोदी सरपंच द्वारा आयोजित हळदी कुंकु कार्यक्रमाचे दिनांक : २९ रोजी ग्राम पंचायत कार्यालय येथे आयौजन  करण्यात आले. कार्यक्रमात गावातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटक वर्षा शहारे प. स. सदस्य, तर सहउद्घाटक कविता रंगारी जि. प. सदस्य व चंद्रकला डोंगरवार जि. प. सदस्य, तसेच निशा तोड़ासे जि. प. सदस्य या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. दीपप्रज्ज्वलन रंजु भोई ग्रा. प. सदस्य सौंदड, रूपाली टेंभूर्ण माजी जि. प. सदस्य, भावना यावलकर, स्नेहा हर्ष मोदी, दिव्याताई बनकर या होत्या.

विशेष अतिथि निशा काशिवार प. स. सदस्य, संगीता खेकरे होत्या आणि प्रमुख अतिथि कुंदा साखरे ग्रा. प. सद्स्य सौंदड, सुषमा राऊत ग्रा. प. सदस्य सौंदड, प्रमिल निर्वाण ग्रा. प. सदस्य सौंदड, अर्चना चन्नें ग्रा. प. सदस्य सौंदड, रंजना गोबाडे माजी सरपंच बोपाबोड़ी, संगीता राऊत, वैशालि रामटेके माजी उपसरपंच बोपाबोडी, स्वेता रंगारी ग्रामसंग सड़क अर्जुनी, मयूरी घरडे आरोग्य अधिकारी, ज्योती इरले, रोशनी सारंगपुरे आदि. यांच्या प्रमुख उपस्थितित कार्यक्रम पार पडले. यावेळी पाहुण्यांनी आपले मनोगत वेक्त केले. महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम सह वान वाटपाचे कार्यक्रम आटोपल्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक हर्ष मोदी सरपंच ग्रा. प. सौंदड यानी केले. कार्यक्रमाचे संचालन लता ठाकरे यानी केले तर आभार रंजना भोई यांनी मानले. कार्यक्रमाची सुरवात महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे  स्वागत.. स्वागत गीताने करण्यात आले.


 

Leave a Comment