गोंदिया, दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२३ : नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले श्रेणी पोलीस उप-निरीक्षक हरीचंद्र कोडुजी धूर्वे यांचा निखील पिंगळे पोलीस अधीक्षक यांचे शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, आणि सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, व शुभेच्छापत्र देवून ३१ जानेवारी रोजी सत्कार करण्यात आले. सदरचे सेवानिवृत्ती निरोप व सत्कार समारंभ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, कल्याण शाखेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक महादेव शिद, तसेच पोलीस अंमलदार राज वैद्य, राजू डोंगरे, त्याचप्रमाणे धुर्वे यांचे परिवारातील सदस्य उपस्थित होते. त्यांचे भावी आयुष्याचे वाटचालीसाठी शुभेच्छा देवून अभिनंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सहा. पोलीस निरीक्षक महादेव शिद, प्रभारी कल्याण शाखा यांनी केले असुन सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्या करीता पो. हवा. राज वैद्य, राजु डोंगरे, यांनी उत्तमरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले.