घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस ठोठावली सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा


गोंदिया, दिनांक : 04 फेब्रुवारी 2023 : ओमप्रकाश फुंडे हे दि. 11 व 12 एप्रिल 2021 रोजी दरम्यान बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने त्यांचे घराचे कुलूप तोडून घरात कपाटातील 1 लाख 59 हजार नगदी व 46 हजार रुपये सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारी वरून पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे अप. क्रमांक 139/2021 भादंवि कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान आरोपी नामे विक्की राधेश्याम सूर्यवंशी वय 30 वर्षे रा. संजय नगर गोंदिया यास अटक करण्यात आले होते. सबळ साक्ष पुरावा गोळा करून तपासाअंती आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले व केस क्र : 243/2022 प्रमाणे खटला चालविण्यात आले.

सदर गुन्ह्याचे खटल्याचे सुनावणी दरम्यान सबळ साक्ष पुराव्यावरून आरोपी नामे – विक्की राधेश्याम सूर्यवंशी वय 30 वर्षे रा. संजय नगर गोंदिया याचे विरूध्द दोष सिद्ध झाल्याने मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजित कुलकर्णी, न्यायालय गोंदिया यांनी आरोपी यांस दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी भादंवि कलम 454 अंतर्गत 2 वर्षे सश्रम कारा वास व 1 हजार रू द्रव्यदंड, भादंवि कलम 457, 380 अंतर्गत 5 वर्षे सश्रमकारावास व 1 हजार रु द्रव्यदंडा ची शिक्षा ठोठावलेली आहे.

सदर शिक्षा झालेल्या गुन्ह्या चा तपास- पोउपनि ब्रिजकिशोर तिवारी यांनी केले असून सदर गुन्ह्याचा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता, एडवोकेट रामटेके यांनी तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून स. पो. उप. नि. नैताम यांनी कामकाज केले आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने, यांनी पो. ठाणे गोंदिया ग्रामीण चे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांचे आणि गुन्ह्याचे तपासी अधिकारी, तपासात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले.


 

Leave a Comment