गोंदिया, दिनांक : 04 फेब्रुवारी 2023 : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास खात्री लायक माहिती मिळाली त्या आधारावर ३० जानेवारी रोजी छापा घालून कारवाई केली असता. अवैध रित्या विक्री करीता गांजा ची साठवणूक करून व गांजा च्या छोट्या छोट्या पुड्या तयार करीत असतांना इसम नामे 1) शुभम सुनील भांडारकर वय 20 वर्षे, 2) मनीष दीपक रामटेके वय 25 वर्षे, दोन्ही मिळून आले. 3) फरार आरोपी नामे आकाश उर्फ टेम्पो उर्फ छोटू राजु रामटेके रा. पूनाटोली गोंदिया याचे राहते घरी 4 नग मोठ्या प्लास्टिक बोरीत, केसरी रंगाचे वेस्टन असलेले प्लास्टिक पॉलीथीनचे आवरान करून पॅकिंग केलेले प्रत्येकी साधारण अंदाजे 1 किलो वजन असलेले एकूण 68 नग पॅकेट, तसेच ईतर वेग वेगळ्या पॉलीथीन मध्ये खुला गांजा, तसेच 4, 5, ग्रॅम चे छोटे पॅकेट असा एकूण 75 किलो 483 ग्रॅम, कि. 11, लाख 32 हजार 245 रू. एक वजन काटा किमत 3 हजार रु असा एकूण 11 लाख 35 हजार 245 रूपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला.
अवैधरित्या मिळून आलेला जप्त गांजा दोन्ही आरोपी सह पोलीस ठाणे रामनगर पोलिसांचे ताब्यात देण्यात येवून स्वाधीन करण्यात आले आहे. अवैधरित्या गांजाची विक्री करीता साठवणूक करून बाळगल्या प्रकरणी आरोपी नामे याचे विरूध्द पो. उप. नि. महेश विघ्ने यांचे फिर्याद वरून पो. ठाणे रामनगर येथे कलम 8 ( क ) , 20, 29 एन डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे नेतृत्वात व उपस्थित, आणि मार्गदर्शनाखाली पो. उप. नि. महेश विघ्ने, जीवन पाटील, पो. अंमलदार पो. हवा. राजू मिश्रा, भूवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र सिंह तूरकर, इंद्रजित बीसेन नेवालाल भेलावे, तुलसीदास लुटे, प्रकाश गायधने, अर्जुन कावळे, चा. पो. शि मुरलीधर पांडे, साकिर शेख यांनी कामगीरी केली आहे.