उड्डाण पुलाचे काम संतगतीने अन् प्रवासी झाले हैरान!


सौंदड : दिंनाक : 20 जानेवारी 2023 : सौंदड येथील उड्डाण पुलाचे काम संत गतीने चालू असल्याने वाहन धारकांना तासोंतास उभे राहावे लागत आहे. गेली तीन वर्षे पासून चालू असलेले उड्डाण पुलाचे काम कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा गावकरी लोकांना आहे. नुकतेच निवडणुकी पूर्वी भाजप चे खासदार सुनील मेंढे यांनी भेट देऊन पुलाची पाहणी केली. नागरिकांच्या समस्या तथा बस स्थानक पंधरा दिवसात उभे होणार असे आश्वासन दिले होते. मात्र गेली दोन महिन्यांच कालावधी लोटला असला तरी बस स्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळेनासे झाले आहे. लोक प्रतिनिधींचे आश्वासन आणि जनतेची मागणी आजही अपूर्णच राहिली आहे. त्यामुळे गावकरी संताप वेकत करीत आहेत.

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर असलेल्या ग्राम सौंदड येथे गोंदिया ते चंद्रपूर रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गाने दिवसभर मालगाड्या आणि प्रवासी रेल्वे गाड्या मोठ्या प्रमाणावर धावतात. त्यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 हा नागपूर ते रायपूर मार्ग असल्याने या मार्गाने देखील मोठ्या प्रमाणावर मालगाड्या आणि प्रवासी वाहने धावतात.

त्या मुळे रेल्वे विभागाचे गेट राष्ट्रीय महामार्गवर असल्याने ते दिवसभरात 5 ते 10 वेळ बंद केली जाते. अश्यात राष्ट्रीय महामार्ग वर 2 ते 3 किमी अंतर लांब वाहने थांबून राहतात. त्या मुळे वाहन धारकांना तसोंतास तात्काळत राहावे लागते. केंद्र शासनाने यावर उपाय योजना काढत मुख्य मार्गावर उड्डाण पुलाचे निर्माण कार्य चालू केले. जे कार्य दोन वर्षात पूर्ण होणार होते. ते आता तीन वर्ष लोटून देखील काम पूर्ण झाले नाही. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीने जनतेच्या समस्या तात्काळ मार्ग लागावे अशी मागणी आहे.


 

Leave a Comment