गूगल कंपनी 12 हजार तर माइक्रोसॉफ्ट कंपनी 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार


नवी दिल्ली, दिनांक : २१ जानेवारी २०२३ : टेक सेक्टरमध्ये नोकर कपातीचे सत्र सुरुच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जगभरातील अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यातच आता जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलची पॅरेंट कंपनी Alphabet Inc 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे CEO सुंदर पिचाईने या नोकर कपातीची घोषणा केली असून, याबाबत कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात होत असल्यामुळे टेक इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, गूगलची प्रतिस्पर्धी कंपनी माइक्रोसॉफ्ट कॉर्पनेही 10,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची घोषणा केली आहे.

या नोकर कपातीबाबत सुंदर पिचाई म्हणाले की, आम्ही 12 हजार कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना याबाबत आधीच ईमेल पाठवण्यात आला आहे. आमच्यासोबत काम करणाऱ्या मेहनती आणि प्रतिभावान लोकांना अलविदा करण्याची वेळ आली आहे. मी या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि त्या कर्मचाऱ्यांची माफी मागतो.


 

Leave a Comment