लाचखोर! ग्रामसेवक अडकला एसीबी च्या जाळ्यात.


गोंदिया, दिंनाक : 20 जानेवारी 2023 : अकरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना लटोरी येथील ग्रामसेवक सुनील ईश्वरदास दोनोडे हा गोंदिया येथील लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. शाळा रंग रंगोटी व नालीसफाईचे असे तीन लक्ष रुपयाचे कामाचे बिल व मनरेगा अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मंजूर करून समोर पाठवण्याकरिता त्याने तक्रार दाराकडे 12 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. दरम्यान तळजोड अंती 11 हजार रुपयाची लाच पंचा समक्ष स्वीकारले. दि. 19 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया तर्फे ग्रामपंचायत लटोरी येथे सापळा रचून ग्रामसेवक सुनील दोनोडे यांचे कक्षात लाच स्वीकारताना त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस स्टेशन आमगाव येथे करण्यात आली असून. येथे ग्रामसेवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाचे उपअधीक्षक पुरुषोत्तम आहेरकर , पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, हवालदार संजय बोहरे, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, मंगेश हालकर, संतोष बोपचे, अशोक कापसे, चालक दीपक बतबरवे यांच्या टीम ने केली आहे.


 

Leave a Comment