लोहिया विद्यालयातील प्रयोगांची जिल्हास्तरासाठी निवड


गोंदिया, दिनांक : १४ जानेवारी २०२३ : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथून पंचायत समिती, सडक अर्जनी द्वारा आयोजित फुलीचंद भगत ज्युनिअर कॉलेज, कोसमतोंडी येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत विद्यालयातून समाविष्ट तीन प्रायोगांपैकी वर्ग ६ ते ८ या प्राथमिक गटातील वर्ग ८ चा अरमान शब्बीर कुरेशी याच्या ” वाहतूक कोंडीवर उपाययोजना” या प्रयोगाला तिसरा क्रमांक मिळाला असून या प्रयोगाची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे.

त्याचप्रमाणे प्रयोगशाळा सहाय्यक – परिचर गटातून विद्यालयातील आर. सी. अवरासे यांच्या” प्रायोगिक साहित्य व त्यांचे उपयोजन “या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांच्याही या प्रयोगाची सुद्धा जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे. प्रयोगाची जिल्हास्तरासाठी निवड झाल्याबद्दल अरमानचे जगदीश लोहिया संस्थापक – संस्थाध्यक्ष लो. शि. संस्था सौंदड, पंकज लोहिया सदस्य लो. शि. संस्था यांनी अरमानचे अभिनंदन केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, पर्यवेक्षिका कल्पना काळे यांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.

त्याचबरोबर प्राध्यापक आर. एन. अग्रवाल व विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सुद्धा अभिनंदन केले. तसेच शालेय सर्व घटकांनीअरमान व अवरासे यांना जिल्हास्तराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Comment