राष्ट्रमाता जिजाऊ चे विचार स्वराज्यासाठी प्रेरक : आ. मनोहर चंद्रिकापुरे


गोंदिया, दिनांक : १४ जानेवार २०२३ : महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा पुरोगामी विचारसरणीची आहे. सध्या देशाची राज्याची राजकीय, सामाजिक दृष्ट्या प्रदुषित होत आहे. या स्थितीचा विचार करता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चे विचार राज्य प्रेरक असल्याचे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अर्जुनी मोरगाव द्वारे समाज मंदिर नगर पंचायत अर्जुनी/मोर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे आयोजन १२ जानेवारीला करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. मनोहर चंद्रिकापुरे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाने, प्राचार्य मंजुताई चंद्रिकापुरे, नगरध्यक्ष मंजुषा बारसागडे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक भोजराज रहिले, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष उद्धव मेहंदळे, महिला तालुकाध्यक्ष सुशीला हलमारे, नगर सेविका दिक्षा शहारे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष राकेश लंजे, किसान सेलचे तालुका अध्यक्ष रतिराम राणे, सामाजिक सेल चे आर. के. जांभूळकर, युवती तालुका अध्यक्ष हर्षला राऊत इतर मानयवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आ. चंद्रिकापुरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी पासुन जिजाऊ जयंती १२ जानेवारी पर्यंत सामाजिक सलोखा म्हणून साजरा करीत आहोत, महिलांसाठी हा दशरामौत्सव प्रेरक आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्यप्रेरीका राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य निर्मिती राजे शिवछत्रपती ते स्वराज्यरक्षक संभाजी राजे यांचा ईतिहास समाजासाठी विशेषत: महीलासाठी सदोदित प्रेरक आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांनी आपण प्रेरित होऊन स्वतःला समाजाला घडवावेत असे सुद्धा ते म्हणाले, याप्रंसगी मंजुताई चंद्रिकापूरे, लोकपाल गहाणे, मंजुषा बारसागडे, उद्धव मेहंदळे, सुशीला हलमारे, निशाताई मस्के यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पुष्पलता द्रुगकर, नरेंद्र रंगारी, निशा मस्के, कविता ठवरे, नम्रता आरेकर, आशा पगाळे, बेबी बोरकुटे, उषा ढोक, नेहा बरैया, संध्या आरसोडे, नरेश रंगारी, पवण वालोदे, हिवराज शहारे, नाशिक शहारे, आनंदराव बावणकुळे, चंद्रशेखर जांभूळकर, धंनजय ग्रिडारे, संजय ईश्वर, डॉ. दिपक रहेले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास रामटेके यांनी केले तर आभार अजय पाऊलझगडे यांनी मानले.


 

Leave a Comment