जिल्ह्यात महिन्याला 9 लोकांचा अपघाती मृत्यू होतोय : सतीश डेहनकर


सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : 11 जानेवारी 2023 : जिल्ह्यात महिन्याला 9 लोकांचा अपघाती मृत्यू होतोय असे प्रतिपादन सतीश डेहनकर सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी मंचावरून केले ते 33 वा महाराष्ट्र राज्य रस्ते सुरक्षा अभियान चे उद्घाटन समारंभ प्रसंगी मंचावरून बोलत होते.

ते पुढे म्हणाले राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर दररोज अपघात होतात. यात 31 ते 50 वयातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. सन 2022 या मागिल वर्षात गोंदिया जिल्ह्यात महामार्गावर 160 अपघात झाले. अपघातामध्ये 97 लोकांचा मृत्यू झाला. यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. भारतात 59.7 टक्के अपघात ओवरस्पीड मुळे होतात. रात्रीला वाहन चालवणे मोठे धोक्याचे आहे. हेल्मेट नियमित घातले पाहिजे. असे मत त्यांनी वेक्त केले. दर वर्षी महाराष्ट्र राज्य रस्ते सुरक्षा अभियान पोलिस विभागाच्या वतीने जनतेला जागृत करण्यासाठी आयौजित केले जाते. जनतेने नियमांचे पालन केले तर अपघात दर कमी होतील असे दरम्यान ते बोलत होते.

आज 11 जानेवारी 2023 रोजी महामार्ग पोलीस मदत केंद्र डोंगरगाव सडक अर्जुनी येथे 33 वा महाराष्ट्र राज्य रस्ते सुरक्षा अभियान चे उद्घाटन समारंभ संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौंदड येथील नव निर्वाचित सरपंच हर्ष मोदी उपस्थित होते. कोरोणा काळात पोलिस विभागाने केलेल्या कामगिरी बद्दल त्यांनी मंचावरून पोलिस विभागाचे त्यांनी आभार मानले.

यावेळी सौंदड येथील ग्राम पंचायत सदस्य सुभम जनबंधू , संपादक, पत्रकार बबलु मारवाडे, डॉक्टर सुशील लाडे, पत्रकार सुधीर शिवणकर, पत्रकार निशांत राऊत, पत्रकार शाहिद पठाण, पत्रकार आर. वी. मेश्राम, पत्रकार बिरला गणवीर, पत्रकार अनिल मुनेस्वर आणि आय टी आय कॉलेज चे विद्यार्थी, शिक्षक आणि राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्र चे सर्व पोलिस उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास गावंडे यांनी केले तर आभार पोलिस नाईक प्रशांत मेश्राम यांनी मानले तसेच भारताचे माजी पंतप्रधान माननीय लाल बहादूर शास्त्री यांचे स्मृतिदिन निमीत्ताने श्रद्धांजली अर्पण करीत कार्यक्रमाची सांगता झाली.


 

Leave a Comment