सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 03 जानेवारी 2023 : निवडणुकी नंतर पक्ष किंवा राजकारण गावात करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या गावाचा विकास कसा करता येईल यावर भर दिले पाहिजे. असे प्रतिपादन सौंदड येथील नव निर्वाचित सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी यांनी केले. ते क्रांती जोती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या औचित्याने बोलत होते. ते पुढे म्हणाले क्रांती जोती सावित्री बाई फुले यांनी जनतेचा हीत पाहता कुठलाही पक्ष पात न करता समाजातील प्रत्येक घटकाला मदत केली.
अखेर त्यांचा जीवन गोर गरीबांच्या सेवेत गेले त्या मुळे त्या आज पूजनीय वंदनीय म्हणून पुजल्या जातात. असे दरम्यान ते बोलत होते. सौन्दड येथील माळी समाज भवन येथे क्रांती सूर्य जोतीबा फुले आणि क्रांती जोती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नव निर्वाचित सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी तसेच नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य आणि गावातील विविध समाजाचे अध्यक्ष व सरपंच पदासाठी निवडणुकीत उभे असलेले उमेदवार देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात माळी समाज भवन येथे झाली तर ग्राम पंचायत भवन येथे देखील महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य निशा तोडासे, प.स. सदस्य वर्षा शाहारे, त.मु.स. अध्यक्ष चरण शाहारे, संदिप मोदी, भावराव यावलकर, जी. प. सदस्य टेंभुर्ने ताई, ओमकार टेंभुर्ने, राजेश जनबंधू, सागर वैश, शंकर खेकरे, पुरुषोत्तम निंबेकर, रंजू भोई, सुभम जनबंधू , त्रीषरन शाहारे, बबलू मारवाडे, सावल इरले तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.