वार्ड क्रमांक 17 मध्ये क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी


सडक अर्जुनी, दिनांक : 03 जानेवारी 2023 : स्थानिक वार्ड क्रमांक 17 येथील रोशन बडोले यांच्या घरी क्रांतीज्योती सावित्री माता फुले यांची 192 वी जयंती साजरी करण्यात आली. त्या ठिकाणी वार्डातील बहुजन महिला उपस्थित राहून सावित्री मातेला वंदन करून त्यांची जयंती साजरी  करण्यात आली. यावेळी वार्ड क्रमांक 17 मधील उषा कोरे, रेखा मुनीश्वर, अनुसया कोरे, रेखा शेंडे, देवश्री फुंडे, आरती फुंडे, अर्चना डोंगरवार, संध्या खोटेले, प्रिया बडोले, मोनिका हुकरे, मोसमी फुलबांधे तसेच अनेक महिलांनी सावित्री मातेच्या जीवनावर आपापले विचार मांडले सदर कार्यक्रमाचे संचालन पोर्णिमा बडोले यांनी केले तर आभार स्नेहल हेमने यांनी मानले.


 

Leave a Comment