सौंदड ते पळसगाव मार्गावर पुलाची प्रतीक्षा!


सौंदड, दिंनाक : 02 जानेवारी 2022 : तालुक्यातून जाणाऱ्या चलुबंद नदी पलीकडे राहणाऱ्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेली अनेक वर्षे पासून या मार्गावर पुलाची निर्मिती न झाल्याने शेतकरी वर्गातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना आपल्या कामासाठी लांबून प्रवास करावा लागत आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड ते पळसगाव मार्गावर पुलाची प्रतीक्षा गेली अनेक वर्षे पासून शेतकरी व शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे. एक किलो मीटर अंतरावर गाव असला तरी सुविधा नसल्याने तब्बल 5 किमी अंतर लांबून प्रवास करावा लागत आहे.

पळसगाव येथील लोक आपल्या विविध कामासाठी सौंदड येथे येतात तालुक्यात सर्वात मोठे असलेले गाव आणि व्यापारी दृष्टया सक्षम असल्याने गावातील मोठ्या संख्येत नागरिक व विद्यार्थी रोज या गावात येतात. खत, बियाणे, आठवडी बाजार, शाळा, कॉलेज सह येथे विविध सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी एक किमी लांब असलेला प्रवास तब्बल 5 किमी लांबून करावा लागतोय. करीता या ठिकाणी पुलाची निर्मितीची मागणी गेली अनेक वर्षे पासून होत आहे. तरी देखील स्थानिक लोक प्रतिनिधी या प्रकाराला दुर्लक्षित करीत आहेत.


 

Leave a Comment