हातभट्टी दारू च्या ठिकाणावर छापा, 1,90350 रूपयाचा मुद्देमाल जप्त.


गोंदिया, दिनांक : ०९ डिसेंबर २०२२ :  मौजा. परसवाडा येथे तसेच झीलमिली येथे अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी लावून दारू गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्यावर, दिनांक 05/12/2022 रोजी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली आहे. यामध्ये 55 लिटर मोहफुलाची हातभट्टीची दारू , 1160 किलो सडवा मोहफुल रसायन व साहित्य, 60 किलो गुळ, एक होंडा ॲक्टिवा मोटार सायकल असा एकूण किंमत 1,90350 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

मोहाफुलाचे रसायन, आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे. 1) पर्वत सुरेंद्र श्यामकूवर,  2) गोविंदा सुरेंद्र श्यामकुवर, 3) सचिन सुरेंद्र श्यामकुवर, रा. परसवाडा या आरोपीवर पो. ठाणे रावणवाडी येथे कलम 65 (ब)(क)(ड)(ई)(फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे अप. क्र. 429/2022 तसेच आरोपीत 1) सतीश शंकर श्याम कुवर, 2) अभय आनंद रामटेके रा. झिलमिली यांचेवर पो. ठाणे रावणवाडी येथे कलम 65 (ब)(क)(ड)(ई)(फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे अप. क्र. 430/2022, गुन्हा नोंदविण्यात आले आहे.

जिल्ह्यात अवैधरीत्या मोहफुलाची हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ताजने यांनी दिलेल्या आदेशानुसार रावणवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक उद्धव डमाळे यांचे नेतृत्वात सदरची कामगिरी वरिष्ठांचे निर्देश व आदेशाप्रमाणे पो. नि. डमाळे, पोलिस अंमलदार पो हवा. चव्हाण, गौरे, गेडाम चालक इंगळे यांनी केली आहे.


 

Leave a Comment