सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०९ डिसेंबर २०२२ : पोलीस स्टेशन डुग्गीपार चे ठाणेदार सचिन वांगडे यांना दि.०५ डिसेंबर रोजी गुप्त बातमीदार कडुन माहीती मिळाली की एक इसम सडक/अर्जुनी येथे चोरीची मोटार सायकल विकण्याकरीता आलेला आहे. या खबरेवरून ठाणेदार वांगडे यांनी तात्काळ पथक तयार करुन कार्यवाही करण्यास रवाना केले. सदर पथकातील पोलीस अमलदार यांनी संशयीत ईसम यास मोटार सायकल सह पकडुन विचारपुस केली असता त्यानी त्याचे नाव स्वप्नील संजय बंसोड वय २२ वर्षे रा. ककोडी ता. देवरी जि. गोंदिया असे सांगीतले.
त्याला सदरच्या मोटार सायकल बद्दल विचारले असता तो त्याबद्दल उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. त्यानंतर त्याच इसमाकडून हद्दीत दिलेल्या आणखीन चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. सदरच्या पाचही मोटारसायकल या चोरीच्या असल्याच्या दाट संशय असून डुग्गीपार पोलीस या मोटारसायकलच्या मालकांचा तसेच ते कोठून चोरून आणल्या आहेत. याचा तपास घेत आहेत. डुग्गीपार पोलीसांच्या या कार्यवाहीमुळे गाडी चोरणारे तसेच चोरीची गाडी घेणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
मोटारसायकलचे वर्णन, १ ) एक काळया निळया रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस जीचा चेचीस क्र. MBLHA10AMEHD4200, २ ) एक लाल काळया रंगाची हिरो एचएफ डिलक्स जीचा चेचीस क्र. MBLHAW028KHD30397, ३ ) एक लाल काळया रंगाची हिरो एचएफ डिलक्स जीचा चेचीस क्र. MBLHAR050H9L24086, ४ ) एक लाल काळया रंगाची हिरो एचएफ डिलक्स जीचा चेचीस क्र. MBLHAR206HGE10843, ५ ) एक काळया रंगाची होंडा सिडी १०० जीचा चेचीस क्र. ME4JC677MH8103202 असे आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक गोंदिया, निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प देवरी, अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनात पो. स्टे. ड्डग्गीपार चे ठाणेदार सचिन वांगडे, पो. हवा. झुमन वाढई, पो. ना. महेंद्र सोनवाने, पोशि सुनिल डहाके, पोशि अमोल राऊत यांनी केली आहे.