- जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम.
गोंदिया / प्रतिनिधी, दिनांक : ०९ डिसेंबर २०२२ : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथे स्नेह मिलन व सेवानिवृत्त लोकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील सेवानिवृत्त लोकांचा सत्कार करण्यात आला. जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था सौंदडच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था सौंदडच्या वतीने दरवर्षी लोकोपयोगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
तसेच गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्यांना वाचा फोडण्याकरिता जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था ही सदैव प्रयत्नशील असते. कोरोना काळामध्ये नागरिकांच्या सेवेसाठी या संस्थेने उल्लेखनीय कार्य केले. विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच सत्कार या संस्थेच्या वतीने करण्यात येतो.
स्नेह मिलन सोहळ्याचे औचित्य साधून सौंदड गावातील सेवानिवृत्त लोकांच्या सत्कार कार्यक्रम सौंदड येथील मोदी भवन कृष्णा वार्ड येथे पार पडला. या शिवाय संस्थेच्या वतीने वार्षिक कॅलेंडरचे सुद्धा विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन जनसेवक हर्ष मोदी यांच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाला डॉक्टर प्रशांत महाराज ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.