संविधान दिनी पंकज वानखेडे यांचा सत्कार


साकोली, भंडारा, दिनांक : ०६ डिसेंबर २०२२ : संविधानाने आपल्याला परिपूर्ण अधिकार दिले आहेत. पण त्याचीही पायमल्ली होत आहे. त्यामुळे बहुजन समाज शिक्षण व नोकरीपासून येणाऱ्या काळात वंचित राहणार आहे. तेव्हा झोपलेल्या बहुजन समाजाने वेळीच खळबळून जागे व्हावे, अन्यथा येणारी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे प्रतिपादन पंकज वानखेडे यांनी केले. पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्धविहार ( बहुजन पार्क ) चिचाळ ( पात्री ) येथे शांतीवन बुद्धविहार तर्फे संविधान दिन तथा सम्राट अशोक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला होता.

शांतीवन बुद्धविहार येथून चकारा रोड ” अड्याळ, सौंदळ पु., कोंढा/कोसरा, चिचाळ, मार्गे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गात येणाऱ्या प्रत्येक बुद्धविहारात भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. रॅलीचा समारोप शांतीवन बुद्धविहारात करण्यात आला. या ठिकाणी भारतीय संविधानाचे पूजन व प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.

माजी खा. खुशाल बोपचे यांच्या हस्ते सम्राट अशोक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. विचार मंचावर बौद्ध भिक्षू संघ , राज्याचे मुख्य सचिव हर्षदीप कांबळे यांचे आईवडिल, माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, शांतीवन कमिटी अध्यक्ष जीवन बौद्ध तसेच सह परिवार , राज्य सरचिटणीस पत्रकार संघ संजीव भांबोरे, सामाजिक कार्यकर्त्या लता भांबोरे , निमा मोहरकर , सरिता जमनिक, विजयकुमार डहाट, शंकर भेंडारकर , पृथ्वी शेंडे, सत्यफुला बौद्ध, पं.स. सदस्य सरिता बिलवणे, सरपंच लोकमुद्रा वैरागडे, लिमचंद बौद्ध, जयेंद्र चव्हाण, कुलदीप गंधे उपस्थित होते.


 

Leave a Comment