सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०६ डिसेंबर २०२२ : तालुक्यातील ग्राम बाम्हणी/ ख. येथील कृषी सहायक कार्यालय ०५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक कार्यालय बाम्हणी च्या वतीने आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रम प्रसंगी राजशेखर राणे कृषि सहाय्यक जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेतकर्यांनी कोणत्या कोणत्या उपाययोजना कराव्या या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व शेतकर्यांनी माती परीक्षण करावे असे आवाहन सुद्धा केले. प्रत्यक्ष शेतावर जाऊन मातीनामुना काढण्याचे प्रशिक्षण दिले. माती नमुने प्रयोगशाळेत पाठवण्या करिता गोळा करून घेतले. तसेच जनजागृती साठी गावात प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास गावचे प्रगतशील शेतकरी व म. रा. ग्रा. जीवनज्योती अभियानाच्या कृषि सखी ललिता ताई चुटे, गट प्रमुख शितल लोकेश तरोने, सुमन विश्वनाथ रहेले, वंदना योगेश्वर डोये, रेखा रवींद्र शिवणकर, पुष्पा हिरालाल गजभिये, ललिता उद्धव भेंडारकर, मीना नरेश कोरे, हिर्काना जागेश्वर वाढई, छाया होमराज पात्रे, मंजुषा आत्माराम शिवणकर, संगीता हेमंत तरोने, नंदा किशोर कोरे, विमल हिरामण शिवणकर, नीता देवेंद्र बडोले ,छाया हेमकृष्ण लंजे, गट प्रमुख दीपिका किशोर तरोने, माया नवीन ह्त्तीमारे, ममता शंकर चुटे, प्रीती जितेंद्र चुटे, सुनिता गंगाधर वाढई, अरुणा कैलास कोडापे, ललिता जीवन चुटे, संध्या सुरेश कोरे, कुसुम पुरुषोत्तम पातोडे, ज्योती टेकचंद चुटे, पोर्णिमा सुजित हत्तीमारे, सुमन मोहन तवाडे, मंजू अरविंद चुटे, तरासान भीमराव रामटेके महिला गटाच्या प्रमुख सौ. शीतल लोकेश तरोने व दिपाली किशोर तरोने, श्यामराव चुटे, नागेश महाडोरे, प्रदीप नंदागवळी, शुभम मेश्राम कृषि सहाय्यक कार्यालय व्यवस्थापक, किशोर तरोने, टिकाराम चुटे, कृषि मित्र शंकर चुटे, बहुसंख्य युवा शेतकरी यांनी कार्यक्रमास उपस्तीती दर्शवली.