मोहफुलाच्या हातभट्टीवर छापा ४४,९०० रुपायाचा मुद्देमाल जप्त. 


गोंदिया, दिनांक : ०६ डिसेंबर २०२२ : पोलीस स्टेशन गंगाझरी ग्राम लेंडेझरी ता. गोरेगाव जि.गोंदिया , जंगल परिसर येथे एक इसम अवैधरित्या मोहफुलाची हातभटटी दारु तयार करीत आहे. अशी माहिती सपोनि पोपट टिळेकर. यांना मिळ्याल्याने ठाणेदार दिनेश लबडे यांना माहिती देवून पोलीस अधिक्षक गोदिया निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक गोदिया कॅम्प देवरी अशोक बनकर आणि प्रमोद मडामे SDPO तिरोडा यांचे मार्गदर्शनामध्ये पो.स्टे गंगाझरी हददी मधील मौजा लेंडेझरी जंगल परिसर ता. गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे ठाणेदार पोलीस स्टेशन गंगाझरी यांचे नेतृत्वात व मागदर्शनाखाली मौजा लेंडेझरी जंगल परिसरात येथे दि. ०४/१२/२०२२ रोजी दोन जर्मन करच्या , सडवा रसायन मोहफुल, हातभट्टी दारु व इतर साहीत्य असा एकुण मुद्येमाल किमती ४४,९००/- रु चा माल मिळुन आले आहे.

आरोपी चैतराम चंभक कामकासे वर ३८ वर्षे रा. लेंडेझरी ता. गोरेगाव जि. गोंदिया, यांचेवर पोलीस स्टेशन गंगाझरी येथे अप. क्र. ३६२/ २०२२ कलम ६५ (ब)(क)(ड)(ई)(फ) महाराष्ट्र दारु बंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आले आहे. सदर कामगिरी वरीष्ठांचे निर्देश व आदेशान्वये ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शना मध्ये सपोनिरी पोपट टिळेकर, मनोहर अंबूले ,पो. शि. कैलाश सोनवणे पो. शि. अशोक मौजे , पो. शि. चा. जितेंदसिंह बघेल यांनी सदर ची कार्यवाही केली आहे.


 

Leave a Comment