आमगाव पोलीस दलातर्फे यशस्वी खेळाडूचां ट्रॅक सूट देवुन गौरव.


आमगाव, गोंदिया, दिनांक : ०५ डिसेंबर २०२२ :  तालुक्यातील भवभुती कॉलेज येथे दि. ०४ डिसेंबर रोजी सकाळी ०८ वाजता गोंदिया पोलीस दलातर्फे अहिंसा मॅरेथॉन दौड २०२२ स्पर्धेत आमगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे यशस्वी खेळाडू विजय चुटे, कु. सुषमा रहांगडाले, लक्ष्मी राने, मिताली नायर, दिव्या रंगारी, रिया शिंगाडे यांचा सपोनि आनंद थिटे. एसडीपीओ कार्यालय आमगाव यांचे तर्फे ट्रॅक सूट देवुन गौरव करण्यात आला. व आमगाव स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे अग्निवीर आर्मी सीआयएसएफ सीआरपीएफ मध्ये भरती झालेल्या यशस्वी विद्यार्थी राहुल उकरे, राहुल मटाले, संदीप मटाले, संदीप बारसे, योगेश पटले, गुलशन टेंभरे, स्नेहल तुरकते, शुभम थेर, अभिषेक कनोजे, संकुल कटरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सपोनी आनंद थिटे, अकादमीचे प्रशिक्षक भौतिक नांदगाव, डॉक्टर राणा, एड. तायडे व इतर मान्यवर व विद्यार्थी हजर होते. पोलीस भरती बाबत सपोनि आनंद थिटे, डॉ. राणा व एड. तायडे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन आमगाव स्पोर्टस अँकॅडमी व प्रशिक्षक भौतिक नांदगाये यांनी केले होते.


 

Leave a Comment