शेतकर्यांनी वर्गणीतून केली गाव मार्गाची दुरुस्ती


सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दिनांक : ०५ डिसेंबर २०२२ : तालुका मुख्यालयातून ३१ किमी अंतरावर आणि जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर बसलेल्या गाव मार्गाची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. गेली १० वर्षे पासून गावकरी नवीन मार्गाची वा जुन्या मार्गाची दुरुस्ठीची मागणी करीत आहेत. तरी देखील स्थानिक लोकप्रतिनिधी या मार्गांच्या नव निर्माण वा दुरुस्ठीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत अश्ल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासन देऊन सुधा आपल्या गावाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्या मुळे आम्ही गावकरी लोकांनी दोन दोन शे रुपये वर्गणी गोळा करून गावातून जाणार्या आणि दुशर्या गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गाची दुरुस्ठी केली आहे.

तालुक्यातील ग्राम मुरपार/ले. येथील शेतकर्यांनी आपली वेथा पत्रकारांना दरम्यान सांगितली. अनेकवेळा आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना निवेदन दिले आहेत. तर गावात कार्यक्रमासाठी आल्यास त्यांना आम्ही आपल्या समस्या सांगतोय. ते लिहून पन नेतात मात्र इथून गेल्या नंतर ते वीसरतात. तालुक्यातील ग्राम कोसमतोंडी ते मुरपार हे अंतर चार किमी लांब आहे. या गावात ९० टक्के लोक उषाची शेती करतात. उष वाहून नेनार्या वाहनामध्ये २० ते २२ टन उषाची भरती असते. मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी वाहन पलटी होऊन अपघात होण्याची शक्यता असते. त्या मुळे आम्ही गावात मिटिंग घेऊन सर्वांनी निर्णय घेतला की सर्व मिळून या मार्गाची दुरुस्ठी करावी.

हा चार किमी डांबर मार्ग २००९ ते २०१३ या कालावधी मध्ये तय्यार करण्यात आला होता. दोनच वर्षात या मार्गाचे पोपडे निघाले. अत्यंत निकृस्ठ दर्जाचा काम संबंधित ठेकेदाराने केला होता. आज घडीला या मार्गावर मोठे खड्डे निर्माण झाल्याने दुचाकी वाहन धारकांना देखील कमालीची कसरत करावी लागते. शेतकऱ्यांना रात्री देखील शेतात जावे लागते. अश्यात खड्डेमय मार्गामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रधान मंत्री सडक यौजनेच्या अधिकार्यांना देखील आम्ही याबाबद सांगितले आहे. मात्र कुणीही याकडे लक्ष्य देत नाही. असे विविध आरोप गावातील शेतकरी बांधवांनी केला आहे. यावेळी केवलराम काशीवार, हेमराज काशिवार, राजकुमार कांबळे, अरुण वासनिक ग्राम पंचायत सदश्य, मुनेस्वर मुग्मोडे, सुधाकर पणधरे माजी प.स. सदस्य सह अनेक गावकरी उपस्थित होते.


 

Leave a Comment