राज्य माहिती आयुक्तांच्या आदेष्याला केराची टोपली!


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०५ डिसेंबर २०२२ : तालुक्यातील ग्राम पंचायत सौन्दड मध्ये तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगमाताने कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते व जिल्हा अध्यक्ष बबलू बाबुराव मारवाडे यांनी केला आहे. ग्राम पंचायत कार्यालय सौन्दड मध्ये वेळोवेळी माहिती अधिकार कायदा २००५ अन्वय विविध विषयावर पत्र लाऊन माहिती मागविली आहे. मात्र हेतू परस्पर माहिती लपविली असून तब्बल पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला मात्र अध्याप माहिती पुरविण्यात आली नाही.

दिनांक : १८, ०५, २०२२ रोजी राज्य माहिती आयुक्त राहुल भा. पांडे नागपूर विभाग यांच्या दालनात विविध विषयाच्या अनुसंघाने तब्बल २१ तक्रार अर्जावर सुनावणी घेण्यात आली होती. सुनावणी दरम्यान जनमाहिती अधिकारी ग्राम पंचायत कार्यालय सौन्दड येथील सचिव यांनी अर्जदार यांना वेळेत माहिती उपलब्ध न करून दिल्या बद्दल. प्रती अर्ज दोन हजार रुपये असा २१ अर्जावर ४४ हजार रुपये नुकसान भरपाई चार आठवड्याच्या आत देण्यात यावे आणि सदर आदेश प्राप्त होताच दोन आठवड्याच्या आत सर्व माहिती अर्जदाराला पुरवावी असे आदेशित केले. आदेश पत्र दिनांक : १४ जून २०२२ असे आहे. दिलेल्या आदेश्या प्रमाणे नुकसान भरपाई ४४ हजार रुपये अर्जदाराला देण्यात आली.

मात्र माहिती अध्याप पुरविण्यात आली नाही. त्यातच उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना उचित कार्यवाई करिता पत्र पाठविण्यात आले आहे. पत्र प्राप्त होऊन तब्बल ६ महिने १९ दिवस लोटले तरी अध्याप अर्जदाराला माहिती पुरविण्यात आली नाही. त्या मुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण अगदी फिट बसली आहे. राज्य माहिती आयुक्त राहुल भा. पांडे नागपूर विभाग यांच्या आदेष्याची चक्क अवहेलना करण्यात आली आहे. त्या मुळे राज्य माहिती आयुक्तांच्या आदेष्याला केराची टोपली! मिळाली अश्ल्याची आता चर्चा परिसरात रंगू लागली आहे. राज्य माहिती आयुक्तांचा दबदबा संपुस्ठात आल्याचे हे चित्र आहे.

आयुक्तांनी नियमानुसार कार्यवाई न केल्यामुळे जनमाहित अधिकारी राज्य माहिती आयुक्तांच्या आदेष्याला जुमानत नाही. परिमाणी सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही. तर गावाच्या विकासासाठी आलेल्या रकमेची अफरातफर करून लोक प्रतिनिधी आपले घर भरत राहतील. यामुळे लोक शाही आणि कायदा समाप्त होईल. त्या मुळे नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. तुमच्या विकासासाठी आलेल्या निधीचा गैर वापर केला जात आहे. काम न करता बिले काढण्याचा सपाटा चालू आहे. माहिती अधिकारात मागितलेली माहिती मिळाल्यास कोट्यावधी रुपयाचा घोटाळा उघळ होणार हे निच्चीत. जागृक नागरिक बना देशाला व आपल्या गावाला वाचवा.


 

Leave a Comment