भंडारा, दि. २३ नोहेंबर २०२२ : भंडारा जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून योगेश विजय कुंभेजकर ( आयएएस ) यांनी दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. श्री. कुंभेजकर यांनी आयआयटी, मुंबई मधून बी. टेक ची पदवी प्राप्त केली असून त्यांनी सन २०१८ ते २०२० या कालावधीत उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी त्यांची जिल्हा परिषद नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी भंडारा या पदाचा कार्यभार स्वीकारला.