शेतकऱ्यांचे तोडलेले विधूत कनेक्शन त्वरीत जोडा अन्यथा करू उग्र आंदोलन : राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन


गोंदिया, दिनांक : २३ नोहेंबर २०२२ : शेतकऱ्यांच्या शेतीतील कृषी विद्युत कनेक्शन बिल न भरण्याचे कारण दाखवून शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी विद्युत कनेक्शन कापत आहेत. त्यामुळे रब्बी धानाची पेरणी व अन्य पिकाची पेरणी थांबलेली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. या विरोधात अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंदिकापुरे यांचे नेते आज दिनांक 22 नोव्हेंबर ला तहसीलदार सडक अर्जुनी मार्फत मा. ना सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री गोंदिया मा. ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या शेतीतील विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद करून ठेवल्यामुळे शेती पंपाला विद्युत पुरवठा खंडित झाला.

तर ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून शेतीपंपाचे कनेक्शन तोडण्यात येऊ नये ज्याचे कनेक्शन तोडले ते कनेक्शन त्वरीत जोडावे अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन द्वारे दिले.

निवेदन देताना अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश कशिवार तालुका महिला अध्यक्ष रजनीताई गिरेपुंजे, तेजराम मडावी नगराध्यक्ष, वंदनाताई डोंगरवार उपाध्यक्षा,कामिनीताई कोवे सभापति, , पंचायत समिती सदस्य डॉ. आर बी वाढई, शिवाजी गाहाणे, उमराव मांढरे , किशोर तरोणे,सुभाष कापगते, उमराव गहाणे, दिक्षा भगत, देवाजी बनकर, शशिकला टेंभुर्ण, ओमराज दखने, आनंद अग्रवाल, यादव खोब्रागडे, खुशाल पटले, मूनेश्वर कापगते, दिलीप कापगते, तिलक चांदेवार, प्रल्हाद झिंगरे, चरणदास झिंगरे, भागवत झिंगरे, मंजुताई डोंगरवार, रोशनी सारंगपुरे उपस्थित होते.


 

Leave a Comment