गोंदिया, दिनांक : २३ नोहेंबर २०२२ : शासनाच्या सर्व योजना ग्रामपंचातला केंद्रस्थानी ठेऊन राबविल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायत आपल्या विचारसरणीच्या लोकांच्या हातामध्ये राहणे गरजेचे आहे. आगामी काळातील ग्रामपंचायत च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांंच्या अडीअडचनी व सामाजिक कार्यात सहभागी व्हावे व पक्षाचे समाजाशी असलेली नाते घट्ट करावे तसेच पक्षाची विचारधारा सर्व सामान्य लोकामध्ये रुजवावी, कारण पक्षाची विचारधारा मजबूत असेल तर पक्ष सुद्धा मजबूत असतो. खासदार प्रफुल पटेल यांच्या सारखे सक्षम नेतृत्व आपल्याकडे आहे. त्यामुळे गावाचा विकासासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस ला निवडून द्या. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुक हि अत्यन्त महत्वाची आहे. म्हणून जास्तीत जास्त सरपंच व सदस्य निवडून आणण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करावा असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील ग्राम रजेगाव येथे रविंद्र ठाकरे यांच्या निवासस्थानी व ग्राम बिर्सी येथे लोकचंद मुंडेले यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, कुंदनभाऊ कटारे, केतन तुरकर, गणेश बरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ग्रामपंचायत निवडणुक असलेल्या पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी ग्रामपंचायत निवडणूक, पक्ष संघटन व अन्य विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, कुंदनभाऊ कटारे, केतन तुरकर, गणेश बरडे, सुनील पटले, बहादुरसिंग यादव, रवींद्र ठाकरे, शिवप्रसाद उद्दारे, जनकलाल कुंजाम, रामू डाहरे, प्रमोद ठाकरे, जितेंद्र रंहागडाले,रवींद्र तावाडे, प्रमोद उपवंशी, राकेश रिनायत, लक्ष्मीचंद बीसेन, अनिता बोपचे, अमृताताई ठाकरे, नारायण पटले, राजकुमार पारधी, ठाकूरप्रसाद बोरकर, लेखराम टेंभरे, नितीन कडवे, प्रवीण ठाकरे, मोहित पटले, गणेश बिसेन, केशव रहांगडाले, शुभम ठाकरे, दिनेश सिह पंडेले, अनिल मंडेले, सुनील डोये, लीलेश्वर तावाडे, अनिल भेंडारकर, नारायण तावाडे, मुन्ना मेश्राम, अर्जुनसिह, योगराज मेश्राम, सुरेश पंधरे, दीनदयाल पंढरेले, श्रीनिवासजी, वीरेंद्र मानकर, मोहनलाल कोहरे, वसंत मेश्राम, निलेश जतपेले, सत्रजित पंडेले, सुरेंद्र भेंडारकर, अशोक नगेले, नीलकंठ हत्तीमारे, अनिल बनसोड, अनिल पंडेले, मदनसिह मंढेले, अरविंद पंडेले, भूमेश्वर सहारे, चंद्रशेखरजी, आमोद सोनवाने, विकास पंडेले सहित अनेक कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.