गडचिरोली, चामोर्शी, दिनांक : ०३ सप्टेंबर २०२२ : तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओलालवार वय 46 वर्ष राहणार चामोर्शी आंबेडकर वार्ड क्रमांक ०७ येथील रहिवासी असून तालुक्यातील विक्रमपूर येथे सरपंच पदावर होते. त्यांनी नवग्राम येथील तक्रारदाराकडून घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता दहा हजार रुपयाची मागणी केली होती.
मात्र तक्रारदारास लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे लाचलुत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तळजोळी अंति 9 हजार रुपयाची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात फसला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर. मधुकर गीते, अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात सुरेंद्र गरड पोलीस उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार दत्तू धोटे, नापोशी राजेश पतंग गिरवा, नापोशी श्रीनिवास संगोजी, नापोशी किशोर ठाकूर, पो.शी. संदीप उडाल, म.पो.शी जोत्सना वसाके, चालक पोहवा तुळशीराम नवघरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली आहे.