सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०३ : सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय,जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा व लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022 या आझादी अमृत महोत्सवी निमित्ताने जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था, सौंदड यांच्या प्रेरणेतून विद्यालयात विद्यार्थी गणेश उत्सवाची सुरूवात 2022 या वर्षापासून करण्यात आलेली आहे.
या निमित्ताने दि.3 सप्टेंबर 2022 ला श्री गणेशाच्या आरती नंतर जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था यांनी ”भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत गणेश उत्सवाचे महत्त्व असून भारतीयांना जोडण्याचे कार्य गणेश उत्सवाने केले. ” असे मार्गदर्शन करून आझादी का अमृत महोत्सवानिमित्त संस्थेदवारा संचालित विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विद्यार्थी गणेश उत्सवाचे प्रथम वर्षानिमित्त त्यांच्या या आयोजनाची स्तुती करून अभिनंदन केले.
तसेच यानिमित्ताने विद्यालयात विद्यार्थांच्या विविध गटात विभागणी करून पुष्पहार, रांगोळी, चित्रकला, भजन, गीतगायन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आला त्यामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी प्रामुख्याने प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे ,पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे तसेच विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विशेष महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी या उत्सवाचे आयोजन केले असे विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयात उद्या दि. 04 सप्टेंबर 2022 ला होणार्या गोपाळकाला व महाप्रसादाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.