शिजलेल्या शालेय पोषण आहारात आढळल्या चक्क अळ्या आणि सोंडे


  • वरिष्ठ प्राथमिक शाळा अंजोरा येथील प्रकार…
  • तो खराब अन्न नसून तो जीरा भात आहे…

 आमगाव, गोंदिया, विशेष प्रतिनिधी, दिनांक : ०३ सप्टेंबर २०२२ : जिल्ह्यातील आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अंजोरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून पुरविण्यात येणाऱ्या शिजवलेल्या भातात चक्क अळ्या आणि सोंडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली. ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात येताच विध्यर्थानी अन्न बाहेर टाकले. हा अन्न खाल्ल्या मुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असती. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असता. या घटनेला घेऊन पालक वर्गांचा शाळेवर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला आहे.



[penci_video url=”https://youtu.be/h-9he_1njXI” align=”left” width=”” /]

राज्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाच्या वतीने माध्यान्ह भोजन देणे सुरू केले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषणआहार पुरविण्याची शासनाची योजना आहे. हा पोषण आहार शाळांमध्येच शिजविला जात असून शाळेतील शिक्षकांच्या देखरेखीखाली काही महिलाच्या हातळून अन्न शिजविले जाते.

मात्र अंजोर येथील शाळेत मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना भोजन वाटप करीत असताना विद्यार्थ्यांना शिजवलेल्या आहारात चक्क अळ्या व सोंडे असलेले अन्न दिले जात असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात येताच विध्यर्थानी संपूर्ण अन्न बाहेर टाकून दिले. याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना होताच पालकांनी शाळेवर मोर्चा काळात तीव्र संताप वैक्त केला आहे. या सर्व प्रकरणाला जबाबदार अश्लेल्या वेक्तीवर कार्यवाई ची मागणी होत आहे. विशेष म्हणजे अन्न पोहचविणारी यंत्रणा यात दोषी तर नाही.

दरम्यान बोलले जात आहे. गावकर्यांनी सांगितले की अन्न तपासून स्वछ करूनच शिजविला पाहिजे. अन्यथा मोठी विपरीत हानी नाकारता येत नाही. विडीओ मध्ये आपण पाहू सकता सुकलेल्या पोषण आहारात चक्क किडे फिरताना दिसत आहेत. हे पोषण आहार स्वच्छ न करता मुलांना सीजउन दिला जात अश्ल्याचा आरोप होत आहे. तेवढच नाही तर शाळे कडून मुलांना सांगण्यात आल की तो खराब अन्न नसून तो जीरा भात आहे. या मुळेच जिल्हा परिषद च्या शाळे मध्ये लाखो रुपये पगार घेणाऱ्या  शिक्षकांचे मुल खाजगी शाळेत शिकतात. आता या गंभीर प्रकारा कडे जिल्हा परिषद गोंदिया काय अक्शन घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

Leave a Comment