कृषी विभागाची शेतकऱ्यांना kYC करण्याची सूचना.
गोंदिया, देवरी 03: प्रधानमंत्री किसान ( PM Kisan ) सन्मान निधी योजनाचा लाभासाठी केंद्र शासनाने ई-केवायसी आवश्यक केली आहे. ई-केवायसीची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून ई-केवायसी न केलेल्या लाभार्थी शेतकर्यांनी दिलेल्या मुदतीत ई-केवायसी करून घ्यावे, अन्यथा लाभापासून वंचीत रहावे लागणार आहे.
शेतकर्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कार्यान्वित आहे. शासनामार्फत लाभार्थी शेतकर्यांना वर्षभरात तीन टप्प्यात प्रत्येकी 2 हजार असे 6 हजार रुपयाचे अनुदाल दिले जाते. मात्र खर्या गरजुंएवजी अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचारी व आयकर भरणारे देखील योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
खर्या गरजुंना याचा लाभ मिळाव व बोगस लाभार्थ्यांवर आळा बसावा यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी आवश्यक केली आहे. संबंधित पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन ई-केवायसी ( खात्याबद्दलची प्रमाणित माहिती ) नोंदविण्यासाठी 7 सप्टेंबर 2022 ही शेवटची तारीख आहे. अडचण असल्यास कृषि विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी खात्यावर योग्य ग्राहक नोंदणी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर या टॅब मध्ये किंवा पीएम किसान अॅपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वत: ऑनलाईन केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येते. तसेच ग्राहक सेवा केंद्रावर ऑनलाईन प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीनही ई-केवायसी करता येते. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ऑनलाईन केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून 7 सप्टेंबरपर्यंत पात्र लाभार्थ्यांनी ती पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी कळविले आहे.