तलाठी मुख्यालई न राहत अश्ल्याने तालुक्यात गौण खनिज चोरीचे प्रमाण वाढले!


सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दिनांक : २६ ऑगस्ट २०२२ : तालुक्यात रोज होत अश्लेल्या अवैध गौण खनिज वाह्तुकी बाबद तालुका महसूल विभाग बग्याची भूमिकेत अश्ल्याचे चित्र आहे. दररोज तालुक्यात जेसीबी आणि ट्रक्टर यांच्या साह्याने मुरूम उत्खनन करून वाहतूक केल जात अश्ल्याचे अनेक चित्र आहेत. तालुक्यात एकही गट मुरूम उत्खनन करण्यासाठी मंजूर नाही. असे काही महसूल विभागाचे कर्मचारी सांगता. मात्र असे असले तरी डव्वा मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात मुरूम टाकण्यात येत अश्ल्याचे ताजे चित्र आहे.



या अवैध गौण खनिज वाहतुकीतून महसूल विभागाला रोज लाखोचा चुना लागत आहे. नुकतेच वन विभाने याच ठिकाणी वाहन जप्तीची कार्यावाई केली होती. मात्र पुन्हा या भागात मुरूम उत्खनन आणि वाहतूक जोमात चालू आहे. हा मुरूम कुठून येते या बाबद संबंधित डव्वा येथील तलाठी मेश्राम यांना भ्रमण ध्वनी वरून आम्ही विचारणा केली असता आपल्याला त्या बाबद काहीच माहित नाही असे उत्तर दिले आहे.



यापूर्वी देखील डव्वा आणि खजरी परिसरातील हजारो ब्रास मुरूम अवैध रित्या उत्खनन करून महामार्गाच्या कडेला टाकण्यात आला होता, त्या बाबद देखील खजरी येथील तलाठी हरिचंद शेंडे यांना विचारणा केली असता त्यांनी सुधा आपल्याला काहीच माहिती नाही असे उत्तर दिले होते. तालुक्यातील काही तलाठी मुख्यालई गावात न राहता तहसील ठिकाणी राहतात. आणि शासनाकडून मुख्याई राहत अश्ल्याचे शासनाला खोटी माहिती देऊन घर भाडे भत्ता वसूल करीत अश्ल्याचे बोलले जात आहे.



त्या मुळे शासनाची देखील फसवणूक केली जात आहे. काही तलाठी मुख्यालई न राहत अश्ल्याने तालुक्यात गौण खनिज चोरीचे प्रमाण वाढले आहे. एकंदरीत सडक अर्जुनी तालुक्यात महसूल विभागाच्या आशीर्वादानेच अवैध गौण खनिज चोरीचे प्रमाण वाढले. त्या मुळे तालुक्यात कुम्पंच शेत खात अश्ल्याची चर्चा आहे. यावर जिल्हाधिकारी नयना गुंडे गोंदिया यांनी चोकसी करण्याची देखील मागणी होत आहे. या अवैध वाहतुकी मुळे गाव मार्गाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे देखील चित्र आहे, महसूल वसुलीचे निकस देखील शासनाने बदलावेत ज्या मुळे महसूल विभागाला महसूल जमा होईल, अवैध उत्खननावर पाहिजे त्या प्रमाणात कार्यवाई होत नसल्याने अनेकांनी जिल्हधिकारी कार्यालय गोंदिया येथे लेखी स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत.



 

Leave a Comment